निवडणूक आयोगाच्या विरोधात CJP आक्रमक; अभिजीत दिपकेंनी केली मोठी मागणी, सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढणार?
निवडणूक आयोगाच्या विरोधात CJP ने आक्रमक भूमिका घेतली आहे. अभिजीत दिपके यांनी आयोगाच्या विरोधात मोठी मागणी केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगात दुफळी निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. निवडणूक आयोगात ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. आयोगातील दोन अधिकाऱ्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला. या आरोपानंतर विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. आता या वादात कॉक्रोच जनता पार्टीची देखील एन्ट्री झाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी आयोगावर गंभीर आरोप केले. त्यानंतर निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केली. दिपके यांच्या मागणीने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अभिजीत दिपके यांनी दिल्लीतून माध्यमांशी संवाद साधला. दिपके म्हणाले, ‘आज कोणते राज्य भाजप जिंकत आहे, ते मोदी लाटेच्या काळातही जिंकले नव्हते. 2014 ते 2019 साली मोदी जिथे जाईल, तिथे निवडणूक जिंकायचे. तेव्हा कोणी सवाल उपस्थित केले नव्हते. तेव्हा मोदी लाट होती. आता जनता ही सरकारवर नाराज आहे. त्यानंतरही मोदी सरकार काही राज्यात सत्ता स्थापन करत आहे. भाजपने मोदी लाटेतही त्या राज्यात सत्ता मिळवली नव्हती. या जागा जिंकण्यासाठी ज्ञानेश कुमार मदत करत आहेत. त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त करण्यात आलं. त्यांना पदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. त्यांना त्वरित पदावरून हटवलं पाहिजे. आयोगातील अधिकाऱ्यांचे मतचोरी केली जात आहे. त्यांच्या मतांनाही गृहीत धरलं जात नाही. ज्ञानेश कुमार हे कोणाच्या सांगण्यावरुन करत आहे, असा सवाल दिपकेंनी केला. ,
सौरभ दास यांनी म्हटलं की, आम्ही अनेक मोहीम राबवत आहे. सर्व जण फिरत आहे. लोकांना बदल हवा आहे. परंतु व्यवस्था कशी बदलणार. मतदान हाच बदल करण्याचा मार्ग आहे. परंतु तोच चोरी केला जात आहे. संपूर्ण देशात व्यवस्था कशी बदलणार, असा सवाल अनेक जण करत आहे. यासाठी एक रिपोर्ट आला आहे. 13 कोटी मत वगळण्यात आली आहे. मागील 10 महिन्यात 14 आक्षेप घेण्यात आले. दोन अधिकाऱ्यांनी आयोगात सर्वकाही सुरळीत चालू नसल्याचे सांगितले. बेकायदेशीरपणे मतदारांची नावे वगळली जात आहे. देशातील युवा मतदार आहे, त्यांना मतदार होण्यापासून रोखलं जात आहे. आजची सिस्टीम पोकळ झाली आहे’.
