जंतर मंतरवरील आंदोलनानंतर 30 हजार जवानांचा राजीनामा? पाकिस्तानचे कनेक्शन, सरकारचा मोठा खुलासा, सत्य तरी काय?

PIB Fact Check: कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतरवर मोठे आंदोलन केले. त्यानंतर काल दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला. ही बडी घाडमोड घडत असतानाच 30 हजार जवानांनी राजीनामा दिल्याचा दावा सोशल मीडियावरून करण्यात आला. त्यावर आता सरकारकडून मोठा खुलासा समोर आला आहे.

जंतर मंतरवरील आंदोलनानंतर 30 हजार जवानांचा राजीनामा? पाकिस्तानचे कनेक्शन, सरकारचा मोठा खुलासा, सत्य तरी काय?
| Updated on: Jul 26, 2026 | 1:13 PM

Jantar Mantar Agitation: नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर जोरदार आंदोलन झाले. काल आंदोलनाला मोठे यश आले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा सोपवला. कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन संपले. त्याचवेळी समाज माध्यमांवर आंदोलनामुळे 30,000 हजार भारतीय सैनिकांनी राजीनामा दिल्याचे वृत्त व्हायरल झाले. आता पत्र सूचना कार्यालयाने PIB ने हे संपूर्ण वृत्त खोडसाळ आणि खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. शनिवारी पीआयबीच्या फॅक्ट चेकने त्यासाठी पाकिस्तान अकाऊंट्सला जबाबदार धरले. पाकिस्तानातील काही सोशल मीडिया हँडलर्स AI जनरेटेड खोटे व्हिडिओ पसरवत असल्याचे म्हटले आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल एन.एस.राजा सुब्रमणी यांना जोडून अशी खोटी माहिती पसरवली जात असल्याचा दावा पत्र सूचना कार्यालयाने केला आहे.

PIB चा मोठा दावा

पीआयबी फॅक्ट चेकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर याविषयीची एक पोस्ट केली आहे. त्यानुसार, पाकिस्तानमधील काही सोशल मीडिया अकाऊंटवरून चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, जनरल एन.एस. सुब्रमणी यांचा एक व्हिडिओ सगळीकडे पाठवला जात आहे. त्यात जंतरमंतरवरील आंदोलनानंतर 30 हजार जवानांनी राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आला होता. पीआयबी फॅक्ट चेकनुसार, हा व्हिडिओ चुकीचा आणि खोटा आहे. तो एआयच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. चीफ ऑफ डिफेंस स्टाफने असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

त्या व्हिडिओत काय?

PIB फॅक्ट चेकनुसार, डिजिटल पद्धतीने मुळ व्हिडिओत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यात सरकारने विद्यार्थ्यांबाबत नरमाईची भूमिका घ्यावी. लष्कारातील 30,000 हून अधिक जवानांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोप केला आहे की त्यांच्या मुलांना नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर लाठ्यांनी झोडून काढण्यात आले. आम्हाला केंद्र सरकारची नोकरी करायची नाही. त्यांना समजावणे कठीण होत आहे. पंतप्रधानांना विनंती आहे की, त्यांनी वेळीच या प्रकरणात हस्तक्षेप करावा. शिक्षण मंत्र्यांना पंतप्रधानांनी राजीनामा देण्यास सांगावे. नाही तर आपले लष्कर या मुद्यावरून विभाजले जाईल, असे वाक्य त्या व्हिडिओत सुब्रमणी यांच्या तोंडी घालण्यात आले आहे.

PIB केवळ यावरच थांबलेले नाही तर त्यांनी मूळ व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. त्यात सुब्रमणी हे इंडियन ऑईल डुरंड कप निमित्ताने बोलताना दिसले. त्यात आशियातील सर्वात प्रसिद्ध स्पर्धा 25 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान पाच व्हायब्रंट शहरात कोलकत्ता, इंफाल, शिलांग, गुवाहाटी आणि पहिल्यांदा रांचीमध्ये होत असल्याची माहिती त्यांनी दिली. पीआयबी फॅक्ट चेकमुळे हा व्हिडिओ खोटा असल्याचे समोर आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us