CJP Jantar Mantar Protest: सीजेपी आंदोलनादरम्यान खरंच भडकणार होती हिंसा? सरकारचा दावा काय?
CJP Jantar Mantar Protest: सीजेपी आंदोलनाचा गैरफायदा घेत काही समाजकंटक मोठी हिंसा भडकवणार असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. पण मागील आंदोलनाती शहाणपण आलेल्या पोलिसांनी यावेळी मोठी खबरदारी घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार घडवण्याचा आणि कायदा-सुरक्षा व्यवस्था बिघडवण्याचा मोठा कट उधळल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, या आंदोलनाच्या नावाखाली काही भागात जाळपोळ आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न काही गट करत होते. पण दिल्ली पोलिसांनी आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी मागील आंदोलनातून धडा घेत वेळीच हा कट हाणून पाडला. त्यांनी हिंसक कारवायांमधील आरोपींची अगोदरच धरपकड केली.
गेल्या आंदोलनातील चुकांमधून मोठा धडा
सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावेळी 20 जुलै रोजी सीजेपीने एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी मागितली होती. पण ही अट मोडून त्यांनी 20 दिवस जंतरमंतवर आंदोलन केले. त्याला तरुणाई लोटली. सुरक्षा यंत्रणांना असामाजिक तत्वांनी चकवा दिला. तेही या गर्दीत सहभागी झाले. त्यांनी पोलिसांवर हल्ले चढवले. गेल्यावेळची ही चूक यावेळी पोलिसांनी अगोदरच दुरुस्त केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलना आडून आपला हेतू साध्य करणाऱ्या असामाजिक तत्वांवर अगोदरच जरब बसवली.
हाय टेक ट्रॅकिंग आणि मॅसेजिंग अॅप्सवर करडी नजर
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. मेश मॅसेजिंग अॅप्सवर करडी नजर ठेवली. रिअल टाईम इंटेलिजन्सचा पुरेपर वापर केला. आंदोलकांच्या हालचाली, त्यांचे गट, त्यांची संख्या आणि ते कोणत्या ठिकाणाहून कुठे जात आहेत. दिल्लीत कुठे येणार आहेत, यावर बारीक लक्ष ठेवण्यात आले. यामुळे पोलिसांच्या कमांड सेंटरला अचूक माहिती मिळाली. त्या त्याठिकाणी फौजफाटा पाठवून तात्काळ त्यांना ताब्यात घेण्यात आले.
अनेक गुन्हेगार अगोदरच ताब्यात
आंदोलनाला गालबोट लावण्याचा अथवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न लक्षात घेऊन पोलिसांनी जुन्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अगोदरच ताब्यात घेतले. त्यांना आंदोलनाच्या आदल्या रात्री आणि सकाळी ताब्यात घेण्यासाठी विशेष मोहिम राबवली गेली. राजधानी दिल्लीतील 15 जिल्ह्यांतून 100 हून अधिक गुन्हेगार आणि संशयितांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे काल कोणतीही हिंसक घटना न घडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आजही पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.