AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता महिलांच्या खात्यात येणार 20000 रुपये, डिसेंबरमध्येच पहिला हप्ता; सरकारचा मोठा निर्णय

उत्तराखंड सरकारने 'बैणी-भुली' नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील. डिसेंबरमध्ये पहिला हप्ता म्हणून 10,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतील. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यास मदत करणे आहे.

आता महिलांच्या खात्यात येणार 20000 रुपये, डिसेंबरमध्येच पहिला हप्ता; सरकारचा मोठा निर्णय
Baini-Bhuli YojanaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 3:26 PM
Share

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक योजना आणल्या आहेत. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू आहे. मध्यप्रदेशात लाडली बहना योजना सुरू आहे. आता याच धर्तीवर उत्तराखंड सरकारने बैणी-भुली योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करण्यात येणार आहे. या नव्या योजनेच्या माध्यमातून महिलांना 20,000 रुपये देण्यात येणार आहे. महिलांच्या बँक खात्यात हे पैसे ट्रान्स्फर होणार आहेत. डिसेंबरमध्ये पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. उरलेले 10 हजार दुसऱ्या हप्त्यात दिले जाणार आहेत. या योजनेमुळे राज्यातील 5.23 लाख महिलाना फायदा होणार आहे.

काय आहे योजना?

या योजनेचं नाव बैणी-भुली योजना असं दिलं आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षण आणि आत्मनिर्भर करण्यासाठी आणि गावात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या योजनेच्या माध्यमातून महिलांना 20,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे.

या योजनेसाठी सरकारने 523 कोटीचं बजेट ठेवलं आहे. पहिल्या टप्प्यात डिसेंबरमध्ये लाभार्थींच्या खात्यात 10 हजार रुपये ट्रान्स्फर केले जाणार आहेत. त्यानंतर 10 हजाराचा दुसरा हप्ता दिला जाणार आहे. प्रत्येक पात्र महिलेला 20 हजाराचा लाभ मिळणार आहे.

कोणत्या महिलांना लाभ?

या योजनेचा पहिला लाभ ग्रामीण भागातील पात्र महिलांना दिला जाणार आहे. ज्या महिला निकषात बसत असतील आणि बचत गटाशी संबंधित आहेत, त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्याचे ग्रामीण विकास मंत्री भारत सिंह चौधरी यांच्या मते, या योजनेतून ग्रामीण आजीविका मिशन आणि स्वयंरोजगाराशी संबंधित कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना लाभ देण्याचं टार्गेट आम्ही ठेवलं आहे. गावात शेती, पशुपालन, हस्तशिल्प आणि लोकल प्रोडक्ट बनवण्याच्या कामाशी संबंधित महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना सहकार्य केलं जाणार आहे.

असे मिळणार हप्ते ?

या योजनेच्या अंतर्गत महिलांना एकूण 20,000 रुपये दोन हप्त्यात दिले जाणार आहेत.

– पहिला हप्ता : 10,000 रुपये। डिसेंबरमध्ये.

– दुसरा हप्ता : 10,000 रुपये।

– एकूण मदत : 20,000 रुपये।

– एकूण लाभार्थी : 5.23 लाख महिला।

Follow Us
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...
राऊतांच्या आरोपांना शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊतांच्या आरोपांना संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला...
Amravati : 2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला कायदेशीर नोटीस