Pune Crime : ….म्हणून मंदार किवळेवर हल्ला? पुणे गोळीबार प्रकरणात पोलिसांची हादरवणारी माहिती
पुण्यात कोर्टाच्या परिसरातच बेलवर बाहेर आलेल्या मंदार किवळेवर टोळक्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. कोर्टाच्या कामासाठी आलेल्या आरोपीवर 3 ते 4 जणांनी वार करून घटनास्थळावरून पळ काढला. पुणे पोलिसांनी 8 ते 10 तपास पथकं तैनात केली असून हल्ल्यामागचं कारण आणि आरोपींचा शोध सुरू आहे.

पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शिवाजीनगर भागात असलेल्या सत्र न्यायालयाच्या परिसरातच एका अट्टल गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला झाला आहे. हा आरोपी चार दिवसांआधीच बेलवर बाहेर आलेला होता. काही कामानिमित्त तो कोर्टाच्या परिसरामध्ये पोहोचलेला असताना ५ ते ६ जणांच्या टोळीने त्याच्यावर आधी गोळीबार केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने हल्ला करत सपासप वार केले आणि घटनास्थळावरुन पोबारा केला. या संपूर्ण प्रकणावर आता पोलिसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले पोलिस?
मंदार किवळेवर हल्ला झाला आहे. तीन चार जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. तो आंबेगाव पोलिस स्टेशनमध्ये मर्डर केसमधील आरोपी आहे. मागच्या आठवड्यामध्ये बेलवर बाहेर आला होता. तो कोर्टातील काही कामानिमित्ताने इथे आला होता. त्याचवेळी हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
या हल्ल्यानंतर आता पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. क्राईम ब्रांचचे पोलिसही दाखल झाले आहे, जो कोणी आरोपी आहे. जो जखमी आह, त्याला ससून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं असून त्याच्यावर उपचार सुरु केले आहेत. क्राईमू ब्रांच, पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम तयार करुन लवकरात लवकर आरोपी अटक करणे आणि पुरावे गोळा करण्यात येत आहेत, असंही यावेळी पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं.
ज्याच्यावर हल्ला झाला त्याचा मृत्यू झाला की नाही याबाबत पोलिसांनी सांगितलं की उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्यावर्षी झालेल्या कात्रजमधील शुभम चव्हाण खून प्रकरणाशी या हल्ल्याचा काही संबंध आहे का या प्रश्नावर पोलिसांनी सांगितलं की, जे कोणी तीन ते चार हल्लेखोर आहेत जण त्यांचा कोणाशी संबंध आहे, ते कोण आहेत? त्याचा मागच्या वर्षीच्या घटनेशी काही संबंध आहे का? त्यांनी हा हल्ला का केला? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. ८ ते १० पथकं या हल्ला प्रकरणाचा तपास करत आहेत, असंही पोलिसांनी यावेळी स्पष्ट केलं.
२०१७ पासून कोर्टाच्या परिसरात हल्ला होणारी ही पुण्यातील तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे. रेकॉर्डवरचे मोठे गुन्हेगार परिसरात असतात. त्यांच्यावरही हल्ले होतात, तर सामान्यांचं काय? हे थांबवण्यासाठी काही उपाययोजना नाही झाल्या नाही तर नागरिकांमध्ये, वकिलांमध्येही दहशतीचं वातावरण वाढत जाईल, असं मत नागरिकांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
