Abhijeet Dipke: धर्मेंद्र प्रधान यांच्या एका राजीनाम्याने काय होणार? अभिजीत दिपके यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने कुणाच्या पोटात गोळा? नवीन आंदोलन छेडणार?

CJP Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या एका राजीनाम्याने काय होणार? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे कुणाच्या पोटात उठला गोळा?

Abhijeet Dipke: धर्मेंद्र प्रधान यांच्या एका राजीनाम्याने काय होणार? अभिजीत दिपके यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने कुणाच्या पोटात गोळा? नवीन आंदोलन छेडणार?
अभिजीत दिपके, सीजेपी
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 16, 2026 | 9:29 AM

Abhijeet Dipke on Dharmendra Pradhan: मे महिन्याच्या अखेरीस अमेरिकेतून अभिजीत दिपके भारतात येत थेट जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांच्या आंदोलनाला दीडच महिन्यात देशभरातील तरुणांनी डोक्यावर घेतले. सरकार जबाबदारीतून पळ काढू शकत नाही असे त्यांनी बजावले. तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर विविध आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टी उतरली आहे. CJP ने सरकारी शाळांच्या नादुरुस्ती आणि असुविधांचा मुद्दा हाती घेतला आहे. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या एका राजीनाम्याने काय होणार? असा सवाल उपस्थित करत दिपेक यांनी अनेकांच्या पोटात गोळा आणला आहे. काय आहे ती पोस्ट?

एका राजीनाम्याने काय होणार?

अभिजीत दिपके यांनी मंगळवारी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट केली. त्यात त्यांनी वृत्तसंस्था पीटीआयचे वृत्त री पोस्ट केले आणि त्याला एक कॅप्शन दिली. त्यांनी विरोधकांवर आणि आत्ममग्न लोकांवर सणसणीत टीका केली. ज्या लोकांना वाटते की आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. सर्व काही बदलणार. पण तसे नाही. प्रधान यांच्या एका राजीनाम्याने काय होणार? असा सवाल त्यांनी केला आहे. तर त्यापुढे त्यांनी एक स्माईली इमोजी पोस्ट केला आहे. त्यावरून त्यांच्या मनात काय सुरू आहे याची चर्चा सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेशात दिपके यांच्या आंदोलनाला मोठे यश

अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात स्कुल ठीक करो, सरकारी शाळा दुरूस्ती आणि शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल करण्यासाठी आंदोलन पुकारलेले आहे. त्यांच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. तर आता उत्तर प्रदेश कॅबिनेटने राज्यातील 14,429 प्राथमिक शाळा स्मार्ट शाळा करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी कॅबिनेट बैठकीत त्याला मंजूरी देण्यात आली. या योजनेसाठी 300 कोटी रुपये खर्च होणार आहे. विशेष म्हणजे CJP या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. इतर राज्यांनीही असाच कित्ता गिरवावा यासाठी पक्ष आग्रही भूमिका घेणार आहे.

आम्हाला अगोदर देशभरात ट्रोल करण्यात आले. पण या विधायक कार्यात लोकांनी मदत केली. महाराष्ट्रातून शाळा दुरुस्ती अभियान सुरू करण्यात आले. राजस्थानमध्ये सीजेपी कार्यकार्त्यांना, नेत्यांना मारहाण झाली. तर आता उत्तर प्रदेश सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. अभिजीत दिपके यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने ते लवकरच इतर राज्यात मोठे आंदोलन छेडणार असल्याचा अंदाज लावल्या जात आहे. आता कोणत्या नेत्याचा राजीनामा सीजेपी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us