माझी केवळ इतकीच इच्छा आहे की…. INDIA आघाडीविषयी अभिजीत दिपके यांचे मोठे वक्तव्य
Abhijeet Dipke on INDIA Bloc: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी इंडिया आघाडीविषयी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे ज्ञानेश कु्मार यांच्याविरोधातील लढ्याला धार चढण्याची शक्यता आहे. दीपके यांनी सोशल मीडियावर याविषयीची पोस्ट केली.

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी इंडिया आघाडीला एकजुटतेची हाक दिली आहे. वृत्तसंस्था PTI सोबत बोलताना त्यांनी मोठे वक्तव्य केले. इंडिया आघाडीचे आंदोलन आणि सीजेपीचे आंदोलनात कोणताही फरक नसल्याचा दावा त्यांनी केला. जे आंदोलक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागत आहेत आणि निवडणूक आयोगाविरोधात शड्डू ठोकून आहेत, त्यांच्यात फूट पाडण्याचा सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा आरोपही दिपके यांनी केला. आपण सरकारच्या या जाळ्यात न अडकण्याची विनंतीही त्यांनी केली. अशावेळी इंडिया आघाडी आणि सीजेपीने एकत्रितरित्या त्यांच्याविरोधात लढायला हवे असा दावा ही त्यांनी केला.
दिपके यांची पोस्ट चर्चेत
13 ऑक्टोबर रोजी दिपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्यात सीजेपीला आंदोलनाची परवानगी मिळाल्यावर काही लोकांनी लागलीच आम्ही भाजपची टीम असल्याची खोटी माहिती पसरवली. काल इंडिया आघाडीने जोरदार आंदोलन केले. पण त्यांच्याविरोधातही 10 ऑक्टोबरला आमच्याबाबत जशी कडक कारवाई करण्यात आली, तशी करण्यात आली नाही. सरकार सीजेपी आणि इंडिया आघाडीला एकमेकांविरोधात उभे करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही दिपके यांनी केला. दिल्लीसह देशात इंडिया आघाडी आणि सीजेपीच्या नेतृत्वात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दोन आंदोलनं सुरू आहेत. त्यावरून या दोघांमध्ये सरकार अविश्वास निर्माण करत असल्याचा दावा दिपके यांनी केला. ही एका विचारांचीच लढाई आहे, असे दिपके म्हणाले.
माझे सर्वांना आवाहन आहे की, आज ते सीजेपीला आंदोलनाची परवानगी देतील आणि दुसऱ्या दिवशी लागलीच हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतील. उद्या कदाचित ते अजून भूमिका बदलवतील. आपण सरकारला प्रश्न विचारून भांडवून सोडणार की एकमेकांकडे शंकेच्या नजरेने पाहणार असा सवालही त्यांनी केला. सरकार सर्व विरोधकांना एकमेकांविरोधात लढवण्याचा प्रयत्नात असल्याचा दावाही त्यांनी केला. पण आपण सरकारविरोधात एकजूटता दाखवणे आवश्यक आहे. आपण त्यांच्या चक्रव्युहात न अडकण्याचे आवाहनही दिपके यांनी केले. ही लढाई एका विचाराने लढण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
When CJP was granted permission to protest, many were quick to float conspiracy theories that we were planted by the BJP.
Yesterday, the INDIA bloc held a massive protest, but there was no crackdown like the one we witnessed on October 10.
This is exactly how the govt plays us against each other. By treating different protests differently, they create suspicion and mistrust among people who are ultimately fighting for the same cause.
My only request to everyone is to see through these tactics. Today, they may allow one protest and crush another. Tomorrow, they could reverse the roles. The idea is to keep us doubting each other instead of questioning those in power.
Don’t let conspiracy theories divide us. Don’t fall into the trap of fighting among ourselves when we should be standing together.
The fight is against Gyanesh Kumar and those protecting him. Don’t lose sight of that.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 13, 2026
शिंदे, रांका आणि दास यांनी तिहार तुरुंगात ठेवणार?
दरम्यान सीजेपीचे नेते अजिंक्य शिंदे, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी काल ताब्यात घेतले होते. जंतरमंतरवर आंदोलनाचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांना तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत पाठवले जाण्याची शक्यता आहे. तर आज सुप्रीम कोर्टात अवमान याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.