CJP Leader: अभिजीत दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका… कमाई होते कुठून?
Abhijit Dipke Saurabh Das and Ashutosh Ranka Income: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सध्या पुन्हा चर्चेत आले आहे. जंतरमंतरकडे जाताना आशुतोषा रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिजीत दिपके यांच्यासह रांका आणि दास यांची कमाई कुठून होते?

CJP Leader Income: कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. रांका आणि दास यांच्यासह सीजेपीच्या इतर नेत्यांनी जंतरमंतर जाण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी तीनही नेत्यांची 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि हमीपत्रावर सुटका झाली होती. या नेत्यांनी तरुणाईमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या तिघांची कमाई होते कुठून?
अभिजीत दिपके यांचे शिक्षण
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत एक रणनीतीकार आणि पत्रकार आहेत. त्यांनी बोस्टन विद्यापीठातून जनसंवाद (Public Relation) विषयात पदवी मिळवली आहे. कॉकरोच जनता पार्टी सुरू करण्यापूर्वी ते आम आदमी पक्षाच्या डिजिटल मीडिया टीमसोबत काम करत होते. त्यांनी दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागात संवाद सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांचा सध्याचा पगार, त्यांची व्यक्तिगत कमाई आणि इतर आमदनी कुठून होते हे अधिकृतपणे समोर आलेले नाही.
सौरव दास सुद्धा पत्रकार
कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते म्हणून काम पाहणारे सौरव दास एक शोध पत्रकार आहेत. ते माहिती अधिकारी म्हणून काम पाहतात. विविध मीडिया प्लॅटफॉर्मवर लेख लिहतात. त्यातून त्यांची कमाई होते. त्यांची कमाई किती आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच पक्षाच्या खर्चात त्यांचे किती योगदान आहे हे सुद्धा समोर आलेले नाही.
आशुतोष रांका यांची कमाई किती?
रणनीतीकार आणि प्रवक्ते म्हणून काम करणारे आशुतोष रांका यांनी आयआयटी कानपूर येथून पदवी घेतली आहे. त्यांनी लंडन येथील मॅकिन्से येथेही काम केले आहे. त्यांनी दिल्लीत आणि राजस्थानमधील काही कामात लोकसहभाग घेतला आहे. पण त्यांच्या कमाईचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.
कॉकरोच जनता पक्षाला निधी मिळतो कुठून?
सुरुवातीला कॉकरोच जनता पार्टीचा खर्च या नेत्यांनी त्यांच्या बचतीतून केल्याचा दावा करण्यात येतो. या बचतीमुळे सुरूवातीला काही दिवस पक्षाचे कामकाज करणे सोपे झाल्याचे सौरव दास यांनी सांगितले होते. कॉकरोच जनता पार्टीचे कोणतेही अधिकृत बँक खाते नाही. या संघटनेला, पक्षाला परदेशातून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. आंदोलनस्थळी डोनेशन बॉक्स ठेवण्यात येतो. त्याठिकाणी ऐच्छिक स्वरुपात कार्यकर्ते, नागरीक त्यांना मदत करतात. पक्षाने अद्याप आर्थिक खर्चाचे गणित मांडलेले नाही.
