AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधी पक्ष, CJP नंतर आता सरकार विरोधात अजून एक मोर्चा उघडणार, देशभरात आंदोलनाची घोषणा

Congress-CJP: काँग्रेसने गेल्या दहा दिवसात दिल्ली दणाणून सोडली आहे. CJP च्या 10 ऑक्टोबरच्या आंदोलनावरून मोठे रणकंदन देशाने पाहिले. SIR, ज्ञानेश कुमार आणि पुढे सरकार असा स्पष्ट अजेंडा समोर आला आहे. आता हाच अजेंडा घेऊन दिल्लीत सरकारविरोधात अजून एक मोर्चा उघडणार आहे.

विरोधी पक्ष, CJP नंतर आता सरकार विरोधात अजून एक मोर्चा उघडणार, देशभरात आंदोलनाची घोषणा
विरोधी पक्ष, CJP नंतर आता सरकार विरोधात अजून एक मोर्चा उघडणार
| Updated on: Oct 13, 2026 | 8:39 AM
Share

Samyukt Kisan Morcha: विरोधी पक्षनेते, कॉकरोच जनता पार्टीने सरकारपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. SIR, केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. आता संयुक्त किसान मोर्चाने (SKM) याच मुद्दावर आंदोलनाची हाक दिली आहे. हरियाणामधील कर्नाल येथे राष्ट्रीय परिषदेची बैठक झाली. त्यानुसार SKM 23 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशात आंदोलन करणार आहे. प्रत्येक जिल्हा, तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी होतील.

तर तरुणी, विद्यार्थ्यांसाठी शेतकरी मैदानात

दिल्लीत नुकतेच जे आंदोलन झाले. त्यात तरुणींचे लैंगिक शोषण आणि अनुचित प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला होता. एसकेएमने आरएसएस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप केला. जर दडपशाही आणि अमानुष प्रकार घडले तर आंदोलनातील तरुणी आणि विद्यार्थ्यांसाठी शेतकरी मैदानात उतरतील अशा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे. सरकारविरोधात आंदोलनाचा मूलभूत अधिकार नागरिकांना आहे. शांततापूर्णरित्या आंदोलन करणाऱ्यांना असा त्रास देणे हे राज्य घटना आणि कायद्याविरोधी आहे.

या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दिल्लीत इतक्या घडामोडी घडत आहेत. आंदोलकांवर पोलीस दबावतंत्राचा वापर करत आहे. तरुणींसोबत अनुचित, अप्रिय घटना घडत असताना सुप्रीम कोर्ट बघ्याची भूमिका घेत असल्याबाबत शेतकरी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची हाक संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे.

SIR तात्काळ रद्द करा

एसआयआर तात्काळ रद्द करा. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याचे आणि त्यांच्यावर खटला दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तर कोणतीही खातरजमा न करता मतदार यादीतून हटवण्यात आलेल्या 13.41 कोटी नागरिकांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली. 2023 मधील अधिनियमात सुधारणा करून निवड समितीत कॅबिनेट मंत्र्‍यांऐवजी सरन्यायाधीशांना स्थान देण्याचीही मागणी किसान मोर्चाने केली आहे.

17 राज्यातील नेते उपस्थित

या बैठकीला 17 राज्यातील नेते उपस्थित होते. यामध्ये अशोक ढवळे, जोगिंदर सिंग उग्राहा, राकेश सिंग टिकैत, राजन क्षीरसागर, डॉ. सुनीलम, जगतार सिंह बाजवा आणइ जोगिंदर सिंह नैन यांचा समावेश होता. या बैठकीत 39 सदस्यांनी मुख्य चर्चेत विचार मांडले. तर 17 राज्यांमधील 142 लोक या बैठकीला हजर होते.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान