CJP Warning : आता हिशोब करण्याची वेळ आली, सीजेपी नेत्याचा सरकारला थेट इशारा, नव्या आंदोलनाला सुरुवात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार निवडणुका निष्पक्षपणे होण्यापासून रोखत आहेत. या निवडणुका निष्पक्षपणे पार पडू नयेत यासाठी केंद्रीय संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय, असा आरोप सौरभ दास यांनी केला.

CJP Warning : आता हिशोब करण्याची वेळ आली, सीजेपी नेत्याचा सरकारला थेट इशारा, नव्या आंदोलनाला सुरुवात?
abhijeet dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 5:40 PM

CJP Saurabh Das : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) सहसंयोजक सौरभ दास यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा दावा करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. ‘सरकारला हिशेब चुकता करण्याचा दिवस वेगाने जवळ येत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला एका प्रकारचं आव्हानच दिलं आहे. पंजाबमधील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) बजावलेल्या समन्सच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

तरुण पिढीला सत्तेचा असा गैरवापर मान्य नाही

सौरभ दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केली. ‘निवडणुका निष्पक्षपणे पार पडू नयेत, यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. विशेषतः विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये प्रत्येक निवडणुकीपूर्वी अशाच प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. सोबतच तरुण पिढीला सत्तेचा असा गैरवापर मान्य नसून सरकारची ही रणनीती आता यशस्वी होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Loading...

दगाबाज ज्ञानू गँग गप्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार निवडणुका निष्पक्षपणे होण्यापासून रोखत आहेत. या निवडणुका निष्पक्षपणे पार पडू नयेत यासाठी केंद्रीय संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय. तर दगाबाज ज्ञानू गँग गप्प आहे. निवडणूक आयोग अशा घोटाळ्यात मदत करत आहे. सत्तेचा अशा प्रकारे केले जाणारा चुकीचा वापर तरुणांना आवडत नाही. सत्तााधाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, असा हल्लाबोल सौरभ दास यांनी केला.

 मतदार सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवतील

यापूर्वीही सौरभ दास यांनी बेरोजगारी, परीक्षांमधील अनियमितता आणि शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवरून मोदी सरकारवर टीका केली होती. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील शहरांची अवस्था, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. आगामी काळात तरुण मतदार सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवतील, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोबतच सीजेपी भविष्यात याच मुद्द्यांना घेऊन नवे आंदोलन छेडणार का, हेही पाहावे लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us