भाजप कार्यकर्त्यांचा घरात घुसून हल्ला; कॉक्रोच जनता पार्टीच्या स्वयंसेवकाच्या वडिलांचा मृत्यू
भाजप कार्यकर्त्यांनी सीजेपीच्या स्वयंसेवकाच्या घरात घुसून हल्ला केला आहे. या हल्ल्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या स्वयंसेवकाच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने रविवारी पश्चिम बंगालमधून भाजपवर गंभीर आरोप केला आहे. पश्चिम बंगालमधील कॉक्रोच जनता पार्टीचा कार्यकर्ता शेख अब्दुल हफीजचे वडील जनाब माफिक यांच्या मृत्यूला भाजपचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सरकारी ‘स्कूल ठीक करो’ अभियानात सहभागी झाला होता. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला घरात घुसून मारहाण केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीत सीजेपी कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे, कॉक्रोच जनता पार्टीच्या विद्यार्थी नेत्याच्या या गंभीर आरोपाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे आशुतोष रांका यांनी म्हटलं की, आम्हाला सरकारी शाळांमध्ये सुधारणा घडवून आणायच्या आहेत. परंतु देशात भाजपचे गुंडे दहशत पसरवत आहेत. अब्दुलची फक्त एकच चूक होती की, त्याला गावातील सरकारी शाळांमध्ये सुधारणा घडवून आणायच्या होत्या. परंतु भाजपच्या गुंडानी मारहाण केल्याने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेच्या विरोधात मी, कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते बांकुरा येथे जाणार आहोत. आम्ही अब्दुलच्या कुटुंबाना न्याय मिळवून द्यायला जाणार आहोत. पश्चिम बंगालमधील कॉक्रोच जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, त्यांनी सोमवारी बांकुरा येथे हजर राहावे. आम्ही भाजपच्या गुंडांना घाबरणारे नाहीत’.
IMPORTANT
हम स्कूल ठीक करना चाह रहे है। लेकिन पूरे देश में भाजपा के गुंडे सिर्फ हिंसा फैला रहे है।
अब्दुल की सिर्फ यह गलती थी कि वो अपने गांव का स्कूल ठीक कराना चाहता था। लेकिन भाजपा के गुंडों ने उसके पिताजी को इतना मारा कि उनकी मौत हो गई।
कल मैं, @VijayMallangi, Ankit, Sudhir… https://t.co/3ssWaJP0yx pic.twitter.com/6EtwxYIcVR
— Ashutosh Ranka (@AshutoshRanka) August 16, 2026
नेमकं काय घडलं?
बांकुरा जिल्ह्याच्या किरसुंडा भागात अब्दुल हफीज 13 ऑगस्ट रोजी गावातील सरकारी शाळा सुधारणा घडवून आणण्यासाठी अभियानात सहभागी झाला होता. परंतु यावरून भाजपचे कार्यकर्त्यांना राग आला. त्यानंतर सायंकाळी भाजप कार्यकर्त्यांनी घरात घुसून हफीजला मारहाण केली. अब्दुल हफीजने हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये अब्दुलने आरोप करताना सांगितलं की, शाळेच्या एका शिक्षकाने राजकीय संघटनेला माझ्या अभियानाविषयी सांगितलं. त्यानंतर माझ्यावर हल्ला झाला आहे’. अब्दुलने पुढे सांगितलं की, ‘मला व्हिडिओ पोस्ट करून माफी मागण्यास सांगत होते. परंतु नकार दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. भाजप कार्यकर्त्यांच्या मारहाणीमुळे कोलकाता शहर सोडून पळ काढावा लागला’. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या अब्दुलच्या वडिलांचा 15 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला, असा दावा त्याने केला आहे. अब्दुलच्या दाव्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले
सीजेपीच्या कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी भाजपवरील आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात भाजप कार्यकर्त्याचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नव्हता, असं म्हणत मुख्यमत्र्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.