AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान ! ‘वंदे भारत’मध्ये जेवणात सापडलं झुरळ, प्रवाशाला ओकारी; आयआरसीटीसीची कठोर कारवाई

हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित प्रवाशाला दुसरे अन्न पदार्थ देण्यात आल्याचं भोपाळच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजरने स्पष्ट केलं. तसेच संबंधितांवर उचित कारवाई करण्यात आल्याचं प्रवाशाला कळविण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सावधान ! 'वंदे भारत'मध्ये जेवणात सापडलं झुरळ, प्रवाशाला ओकारी; आयआरसीटीसीची कठोर कारवाई
cockroachImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 26, 2023 | 9:36 AM
Share

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या जेवणात झुरळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयआरसीटीसीकडून मागवलेल्या जेवणात झुरळ आढळल्याने प्रवाशी चांगलाच संतप्त झाला. या प्रवाशाने थेट रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर आयआरसीटीसीने सेवा देणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई केली आहे. या प्रवाशाने रेल्वेच्या या भोंगळ कारभाराला वाचा फोडतानाच या अन्नात झुरळ निघाल्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

24 जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. हा प्रवासी राणी कमलापती (हबीबगंज)- हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रवाशाने आयआरसीटीसीकडून जेवण मागवलं. ज्यूस आणि दोन पॉकेट जेवणाचे मागवले. त्यात चपाती वगैरे होती. या प्रवाशाने थोडी चपाती खाल्ली.

पण नंतर त्याने चपाती निरखून पाहिली असता त्यात त्याला मेलेलं झुरळ सापडलं. त्यामुळे त्याला मळमळ आणि ओकारी सारखं वाटू लागलं. या घटनेवर त्याने संताप व्यक्त केला. या प्रवाशाने आधी या जेवणाचा फोटो काढला आणि ट्विटरवर वंदे भारत एक्सप्रेसला टॅग करून तक्रार केली. तसेच रेल्वे प्रशासनाकडेही तक्रार केली. रेल्वेत देण्यात येणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आयआरसीटीसीकडून दिलगिरी

प्रवाशाच्या या ट्विटला आयआरसीटीसीने प्रतिसाद दिला आहे. आयआरसीटीसीने या प्रकारावर माफी मागितली आहे. अनाहूतपणे हा दुर्देवी प्रकार घडल्याचं आयआरसीटीसीने म्हटलं आहे. आम्ही हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. तसेच खाद्यपदार्थांची सेवा देणाऱ्या ठेकेदाराला खाद्यपदार्थ देताना काळजी घेण्याची सक्तीची ताकीदही दिली आहे. तसेच ठेकेदाराला दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून किचनची मॉनिटरिंग करण्याचा निर्णय घेतल्याचंही रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

संबंधितांवर कारवाई

दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित प्रवाशाला दुसरे अन्न पदार्थ देण्यात आल्याचं भोपाळच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजरने स्पष्ट केलं. तसेच संबंधितांवर उचित कारवाई करण्यात आल्याचं प्रवाशाला कळविण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, अनेक प्रवाशांनी अन्नाच्या खराब गुणवत्तेबाबत तक्रारी केलेल्या आहेत. तसेच आयआरसीटीसीने उत्तम क्वालिटीचे अन्न देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेची तंबी

दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अन्न पुरवठा करणाऱ्यांना 25 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्यांना कठोर इशाराही देण्यात आला आहे. पुन्हा असा प्रकार घडता कामा नये, अशी तंबीही देण्यात आल्याचं मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली आहे.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....