आम्ही मार खाऊन आलेले लोक, पुढेही.. अभिजीत दिपके यांचे थेट मोठे विधान..

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठे विधान केले. सरकारला पुन्हा इशारा दिला. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुन्हा अभिजीत दिपके मैदानात उतरले आहेत. अभिजीत दिपके यांच्याकडून मोठा मोर्चा दिल्लात काढला जात आहे.

आम्ही मार खाऊन आलेले लोक, पुढेही.. अभिजीत दिपके यांचे थेट मोठे विधान..
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 26, 2026 | 9:39 AM

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनानंतर थेट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनात अभिजीत दिपके यांच्यासोबत आशुतोष रांका आणि साैरभ दास प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले. नुकताच अभिजीत दिपके यांना विचारण्यात आले की, तुम्ही दिल्लीत धिंगाणा घालण्यासाठी येतात का? यावर बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आम्हाला थोडी हे आवडते. पण करावे लागते. आम्ही वारंवार सांगत आहोत की, ज्या विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले, त्या कुटुंबियांना मदत पोहोचवा. 1 कोटी बद्दल आम्ही बोललो होतो. 1 कोटी काही सरकारसाठी मोठी रक्कम नक्कीच नाही.

50 ते 100 कोटी तुम्ही खासदारांना खरेदीसाठी लावता. पुढे अभिजीत दिपके यांनी म्हटले की, 5 सप्टेंबरला आम्ही इंडिया गेट ते पोलिस मुख्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहोत. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि पीडित कुटुंबियांना मदत व्हावी, या आमच्या मागण्या आहेत. रांका यांना हिंसाबद्दल विचारले असता अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आम्ही मार खाऊन येणारे लोक आहोत, मला मारहाण झाली.

Loading...

रांकाला मारहाण झाली. आता फक्त वाचला आहे तो म्हणजे साैरव, त्याचाही नंबर येईल. आम्ही मार खाऊन आलेले लोक आहोत, आम्ही खाऊ मार. अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा सरकारचे टेन्शन वाढवले आहे. 5 सप्टेंबरला पुन्हा दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून मार्च काढला जाणार आहे. त्यापूर्वी सरकारही अलर्ट मोडवर आहेत.

अभिजीत दिपके यांनी काही दिवसांपूर्वीच आपला मोर्चा हा जिल्हा परिषद शाळेंकडे वळवला होता. हिंगोली जिल्ह्यातील अनेक शाळांची पाहणी अभिजीक दिपके यांनी केली. कॉकरोच जनता पार्टीची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे झाली. या बैठकीत महत्वाचे त्यांचे नेते सहभागी झाले. या बैठकीत त्यांनी सध्याच राजकारणात प्रवेश करणार नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us