Abhijeet Dipke: महिलांसाठी 33 टक्के आरक्षण नको, अभिजीत दिपके यांची भाजपकडे मोठी मागणी काय?

Abhijeet Dipke on Women Reservation : केंद्र सरकारने चार दिवसीय संसद अधिवेशन बोलावले आहे. 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा तर 2 डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन होत आहे. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच सीजेपी नेते अभिजीत दिपके यांनी मोठी मागणी केली आहे.

Abhijeet Dipke: महिलांसाठी 33 टक्के आरक्षण नको, अभिजीत दिपके यांची भाजपकडे मोठी मागणी काय?
महिलांसाठी 33 टक्के आरक्षण नको, अभिजीत दिपके यांची नेमकी मागणी काय?
| Updated on: Nov 27, 2026 | 7:06 AM

Abhijeet Dipke on Women Reservation : केंद्र सरकारने चार दिवसीय संसद अधिवेशन बोलावले आहे.30 नोव्हेंबर रोजी लोकसभा तर 2 डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन होईल. 3 डिसेंबर रोजी अधिवेशन संपेल. यामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्याची आणि ती मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषदेत 33 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्याचवेळी काँकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि संयोजक अभिजीत दिपके यांनी मोठी मागणी केली आहे.

अभिजीत दिपके यांची मागणी काय?

Loading...

संसदेसह विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षणाची चर्चा होत असतानाच CJP नेते अभिजीत दिपके यांनी महिलांना 33 टक्क्यांऐवजी थेट 50 टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही मागणी केली. महिलांची लोकसंख्या अर्धी असल्याने त्यांना अर्धे प्रतिनिधीत्व मिळावे अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेला कार्यकर्ते आणि समर्थकांकडून पाठिंबा मिळाला आहे.

भाजपकडे मोठी मागणी

दिपके यांनी राजकीय पक्षांना येत्या विधानसभा निवडणुकीपासूनच आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. महिलांना तिकीट वाटपा दरम्यान 50 टक्के जागा देण्याची मागणी त्यांनी केली. याची सुरुवात भाजपने अगोदर करावी. संसदेत जे होईल, ते होईल. पण अगोदर भाजपने आगामी निवडणुकांमध्ये किती महिलांना तिकीट देणार हे जाहीर करावे असे आवाहन त्यांनी केला. उत्तर प्रदेश, पंजाब निवडणुकीतील सर्व पक्षांनी एकूण जागांपैकी 50 टक्के महिलांना जागा देण्याची मागणी त्यांनी केली.

संसदेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन

संसदेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. या महिन्याच्या अखेरीस अधिवेशनाचा श्रीगणेशा होईल. तर पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्याच्या मध्यात अधिवेशन संपेल. यामध्ये मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आवश्यक ते बहुमत मिळवण्यात सरकारला यश आल्याचे म्हटले जात आहे. विरोधी गोटातील काही पक्षांचे मन वळवण्यात भाजपला यश आल्याचे मानले जात आहे. यामुळे लोकसभेच्या सध्याच्या 543 जागा वाढून त्या कमाल 850 जागा होण्याची शक्यता आहे. 2029 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us