काँग्रेसकडून सर्वात मोठी खेळी! पॉवरफुल नेता मैदानात उतरवला, शरद पवारांची भेट येऊन…डिलिमिटेशन बिलावेळी ऐनवेळी गेम पलटणार?
मल्लिकार्जुन खरगे आज चेन्नई आणि मुंबईच्या दौऱ्यावर असतील. ते चेन्नईत डीएमके पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांची भेट घेतील. या दोन्ही नेत्यांची भेट दुपारी दोन वाजता चेन्नईत होईल.

प्रमोद जगताप, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : येत्या सोमवारी म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत सादर करणार आहे. या विधेयकावर संसदेत पुन्हा एकदा चर्चा होणार असून ते मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. तर हे विधेयक सामान्यांच्या हिताचे नाही. या विधेयकामुळे एसी, एसटी यांच्यावर अन्याय होईल, असा दावा काँग्रेस तसेच इंडिया आघाडीकडून केला जातो. विरोधी बाकावर असलेल्या शरद पवार गट आणि डीएमके हे दोन्ही पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेता आता काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे. काँग्रेसमध्ये पडद्यामागे हालचाली वाढल्या असून या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शरद पवार तसेच एम के स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.
खरगे घेणार स्टॅलिन, शरद पवार यांची भेट
पवार गट आणि डीएमके हे दोन्ही पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही पक्षांच्या खासदारांनी विधेयकाच्या समर्थनार्थ मतदाने केले तर हे विधेयक पारित होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी काँग्रेसकडून आता प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन हे डीएमकेचे प्रमुख एम के स्टॅलिन आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.
मल्लिकार्जुन खरगे आज चेन्नई आणि मुंबईच्या दौऱ्यावर असतील. ते चेन्नईत डीएमके पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांची भेट घेतील. या दोन्ही नेत्यांची भेट दुपारी दोन वाजता चेन्नईत होईल. तर खरगे रात्री मुंबईत येऊन शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीत संबंधित विधेयक सामान्यांच्या कसे हिताचे नाही, याबाबत सांगितले जाणार आहे. तसेच या दोन्ही पक्षप्रमुखांचे मन वळवण्याचा यात प्रयत्न होणार आहे. दरम्यान, आता खरगे यांना या प्रयत्नात यश येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे संसदेत आसनांची व्यवस्था बदलण्यात येत आहे. पाठिंबा देण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्या 97 खासदारांची आसनव्यवस्था बदलण्यात आली आहे. त्यामुळे विधेयक पटलावर ठेवल्यानंतर नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.