पत्रकार परिषदेत बोलता बोलता काँग्रेस नेत्याला ह्रदयविकाचा झटका, क्षणातच मृत्यू, पाहा व्हिडिओ

heart attack incident: काँग्रेस नेते रविचंद्रन पत्रकार परिषदेत बोलत होते. बोलता बोलता अचानक ते खुर्चीवरुन खाली पडले. त्यांना लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे जाहीर केले. ह्रदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलता बोलता काँग्रेस नेत्याला ह्रदयविकाचा झटका, क्षणातच मृत्यू, पाहा व्हिडिओ
काँग्रेस नेत्यास ह्रदयविकाराचा झटका
| Updated on: Aug 20, 2024 | 12:14 PM

बदलत्या जीवनशैलीमुळे वेगवेगळे आजारही वाढले आहे. कधीकाळी 50 नंतर येणारे आजार आता 20 मधील युवकाला येत आहे. ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. कर्नाटकातील बंगळूरुमध्ये ह्रदयविकारचा धक्कादायक प्रकार समोर आला. काँग्रेस नेता पत्रकार परिषदेत बोलत होता. त्यावेळी अचानक त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. क्षणात त्यांना मृत्यूने गाळले. हा व्हिडिओ अंगावर शहारे निर्माण करणारा आहे. बंगळुरुमधील कुरुबा संघाचे अध्यक्ष सीके रविचंद्रन यांचा या घटनेत मृत्यू झाला.

बोलता बोलता मृत्यूने गाठले

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या विरोधातील खटल्यास राज्यपालांनी परवानगी दिली. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात पत्रकार परिषदेचे आयोजन काँग्रेसकडून करण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेस नेते रविचंद्रन बोलत होते. बोलता बोलता अचानक ते खुर्चीवरुन खाली पडले. त्यांना लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे जाहीर केले. ह्रदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

48 सेंकदाचा व्हिडिओ समोर

पत्रकार परिषदेतील या घटनेचा 48 सेंकदाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात रविचंद्रन खुर्चीवर बसून स्थानिक भाषेत माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहे. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागते. त्यांच्या हातातील पेपर खाली पडतात. त्यानंतर बोलता बोलता ते खुर्चीवरुन खाली पडतात. त्यानंतर रुग्णालयात नेल्यावर ह्रदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील प्रकरण

कर्नाटकात सध्या राजकीय गोंधळ सुरू आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जमीन वाटपातील कथित अनियमिततेबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्या विरोधात चौकशीला मंजुरी दिल्याने सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्ष (भाजप) चे कार्यकर्ते आरोप-प्रत्यारोप करत आहेत. रस्त्यावर आंदोलन सुरु आहे. दरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयाने सिद्धरामैय्या यांना दिलासा दिला आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे.