AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana Box Office Collection Day 19: आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’चं वारं फिरलं, 19व्या दिवशी कमाईत घट

Ramayana Box Office Collection Day 19: 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या रामायण या सिनेमाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात किती कमाई केली आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाणून घ्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी...

Ramayana Box Office Collection Day 19: आदिनाथ कोठारेच्या 'रामायण'चं वारं फिरलं, 19व्या दिवशी कमाईत घट
Ramayan Adinath KothareImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 7:42 AM
Share

सध्या जगभरात ‘रामायण’ सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. ‘रामायण’ने तिसऱ्या वीकेंडलाही जोरदार कामगिरी केली. विशेषतः तिसऱ्या रविवारी या चित्रपटाने ३० कोटींहून अधिक कमाई केली. मात्र रिलीजनंतरच्या १९व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या सोमवारी बॉक्स ऑफिसवर त्याची गती मंदावली. जाणून घ्या ‘रामायण’ने १९व्या दिवशी किती कलेक्शन केले.

‘रामायण’ने १९व्या दिवशी किती कमाई केली?

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. दोन आठवडे जोरदार कमाई केल्यानंतर या चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडवरही बॉक्स ऑफिसवर धमाका केला आणि चांगली कमाई केली. मात्र तिसऱ्या सोमवारी ‘रामायण पार्ट १’ची गती मंदावली. तरीही नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाने कमाईत घसरण होऊनही १९व्या दिवशी एक मैलाचा दगड पार केला आहे.

सैकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार ‘रामायण’ने रिलीजनंतरच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच १९व्या दिवशी १२.७० कोटी रुपये कमाई केली आहे. यामुळे ‘रामायण’ची भारतातील १९ दिवसांची नेट कमाई आता ९५५.४५ कोटी रुपये झाली आहे.

‘रामायण’चे डे-वाइज कलेक्शन

‘रामायण’ची सुरुवात ५ नोव्हेंबरला ६४.८५ कोटी रुपये (नेट) कलेक्शनने झाली होती.

या चित्रपटाने ५व्या दिवशी आतापर्यंतचे सर्वात मोठे सिंगल-डे कलेक्शन नोंदवले, तेव्हा त्याने १०७.५० कोटी रुपये कमावले होते.

त्याने पहिल्या आठ दिवसांच्या एक्सटेंडेड आठवड्यात ५६४.६० कोटी रुपये कमाई केली होती.

दुसऱ्या आठवड्यात (९व्या ते १५व्या दिवसापर्यंत) चित्रपटाने २९९.१५ कोटी रुपये कमाई केली, जी पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ४७ टक्के कमी आहे.

त्यानंतर १६व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी त्याने १५.७५ कोटी कमावले, तर तिसऱ्या शनिवारी कलेक्शन २७.६५ कोटी रुपये राहिले.

१८व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी या चित्रपटाने कमाईत मोठी वाढ दाखवत ३५.६० कोटी रुपये कमावले.

‘रामायण’ तिसऱ्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला

‘रामायण’च्या कमाईत तिसऱ्या सोमवारी आतापर्यंतची सर्वात मोठी मंदी नोंदवली गेली, तरीही त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. १२.७० कोटी कमावून ‘रामायण’ तिसऱ्या सोमवारी बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. त्याने ‘धुरंधर २’पासून ‘छावा’, ‘स्त्री २’, ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘जवान’सह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या थर्ड मंडे कलेक्शनला मागे टाकले आहे.

तिसऱ्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० बॉलिवूड चित्रपटांची यादी

– धुरंधर: १९.७ कोटी

– रामायण: १२.७० कोटी

– धुरंधर २: ११ कोटी

– छावा: ७.७४ कोटी

– स्त्री २: ६.७५ कोटी

– अ‍ॅनिमल: ५.५५ कोटी

– जवान: ५.४५ कोटी

– गदर २: ४.६ कोटी

– पीके: ४.४२ कोटी

– द केरला स्टोरी: ४.४ कोटी

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू