पुलवामा हल्ल्यावर काँग्रेस नेत्याने केले ट्विट; भाजप नेता म्हणाला, “आधी त्यांचा डीएनए तपासा…”

दिग्विजय सिंह यांच्या या वक्तव्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तेवढीच जोरदार टीका करत प्रतिक्रिया दिली आहे.

पुलवामा हल्ल्यावर काँग्रेस नेत्याने केले ट्विट; भाजप नेता म्हणाला, आधी त्यांचा डीएनए तपासा...
| Updated on: Feb 14, 2023 | 8:30 PM

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. 2019 मध्ये पुलवामामध्ये 40 सीआरपीएफ जवान गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे शहीद झाल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यांनी हे ट्विट करण्यामागे 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे त्यांनी हे ट्विट केले आहे.

या हल्ल्यात एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली आपली कार सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर घुसवली होती.

 

स्फोटकांनी भरलेली कार बसवर येऊन आदळल्यामुळे बसमधील चाळीस जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला मंगळवारी चार वर्ष झाल्याबद्दल दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यशैलीवर निशाणा साधला होता.

दिग्विजय सिंह यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून जवानांना आदरांजली वाहिली होती.

 

तर याच संदर्भात दिग्विजय सिंह यांनी ट्विट करून म्हटले आहे की, गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे पुलवामामध्ये शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना आम्ही आदरांजली अर्पण करत आहे. तसेच मला आशा आहे की सर्व शहीद कुटुंबीयांचे शासन योग्य पुनर्वसन करील असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

दिग्विजय सिंह यांच्या या वक्तव्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तेवढीच जोरदार टीका करत प्रतिक्रिया दिली आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे की, दिग्विजय सिंह आणि काँग्रेस पक्षाचा डीएनए सारखाच असावा. मुझे लगता है कि दिग्विजय जी की बुद्धि फेल हो गई है, यह उसका फेलियर है। वे देश की सेना का अपमान करते हैं। जांच दिग्विजय सिंह और कांग्रेस पार्टी के डीएनए की होनी चाहिये, जो भारत जोड़ने के नाम पर तोड़ने वालों के साथ यात्रा करती है। सोनिया जी और राहुल जी को इसका जवाब देना चाहिये। त्यामुळे पुलवामा हल्ल्यावर आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता असल्याची दिसत आहे.

शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे की, आयएसआयसाठी हेरगिरी करणारे कोण होते, ध्रुव सक्सेना त्यांचा नव्हता, 14 लोक होते, तर यामध्ये सर्व बजरंग दल, विहिंप आणि भाजपचे होते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

शिवराजसिंह चौहान यांच्यावर देशद्रोहाचा खटला का चालवला नाही? मला सांगा पाकिस्तान आणि आयएसआयचे हितचिंतक कोण? असा सवालही त्यांनी शिवराजसिंह चौहान यांना उपस्थित केला आहे.