‘आपणच छाती पिटून म्हणतो की पाकिस्तान जबाबदार… पण, पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्याचे धक्कादायक विधान

दहशतवाद्याकडून यादरम्यान हिंदू पर्यटकांना टार्गेट करत गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्लयाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाली. आत एका काँग्रेस नेत्याने पहलगाम हल्ल्याबाबत अत्यंत धक्कादायक विधान केले आहे.

आपणच छाती पिटून म्हणतो की पाकिस्तान जबाबदार... पण, पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्याचे धक्कादायक विधान
Pahalgam terrorist attack
| Updated on: Aug 03, 2025 | 12:32 PM

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण बघायला मिळाले. दहशतवाद्यांकडून यादरम्यान हिंदू पर्यटकांना टार्गेट करत गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्लयाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाली. पाकिस्तानमधून आलेल्या हल्लेखोरांनीच हा हल्ला केल्याचे तपासात पुढे आले. हेच नाही तर भारताकडून या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांविरोधात राबण्यात आले. कलमा वाचण्यास हल्लेखोरांनी पर्यटकांना सांगितले. मात्र, ज्यांना कलमा वाचता आला नाही, त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यानंतर अमित शाह हे काही वेळातच घटनास्थळी पोहोचले होते.

आता पहलगामच्या हल्ल्याबाबत ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी अत्यंत धक्कादायक असे विधान केलंय. मणिशंकर यांनी म्हटले की, भारत सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोषी ठरवले. पण आंतरराष्ट्रीय समुदायातील कोणत्याही देशाने या दाव्यावर विश्वास ठेवला नाहीेये. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे एकून 33 देशांमध्ये पाठवली होती. 

मणिशंकर अय्यर म्हणाले की, ज्या 33 देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवली, त्यापैकी एकाही देशाने पाकिस्तानला पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार धरले नाही. हेच नाही तर संयुक्त राष्ट्राने आणि अमेरिकेने देखील पाकिस्तानला जबाबदार धरले नाही. फक्त आपणच बोलत आहोत, की या हल्ल्याच्या मागे पाकिस्तान आहे..आपल्याला कोणीही गांर्भियाने घेत नाहीये.

ते पुढे म्हणाले की, मुळात म्हणजे आपण हे सिद्ध करण्यात अपयशी झालो की, पाकिस्तानच्या नेमक्या कोणत्या संघटनेने हा हल्ला केला. आपल्याकडे एकही सबूत नाही की, त्यामुळे सिद्ध केले जाऊ शकले की, हा हल्ला पाकिस्तानने केला. आता मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या या विधानामुळे मोठा हंगामा होऊ शकतो. पहलगाम हल्ल्यानंतर लोकांमधील रोष इतका जास्त वाढला की, कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली. ज्यावेळी हा दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात होते, त्यांनी सर्व दाैरे रद्द करत भारत गाठला आणि विमानतळावरच अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक घेतली.