हा पक्षाचा नाही, तर आस्थेचा विषय, काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार अयोध्येत

"हा पक्षाचा विषय नाही हा आस्थेचा विषय आहे. अयोध्येत मी रामाच्या दर्शनाला आलो आहे", असं काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar Ayodhya visit) यांनी सांगितले.

हा पक्षाचा नाही, तर आस्थेचा विषय, काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार अयोध्येत

अयोध्या (उत्तरप्रदेश) : “हा पक्षाचा विषय नाही, हा आस्थेचा विषय आहे. अयोध्येत मी रामाच्या दर्शनाला आलो आहे”, असं काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar Ayodhya visit) यांनी सांगितले. महाविकासआघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी काँग्रेसकडून एकमेव सुनील केदार अयोध्येत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना (Sunil Kedar Ayodhya visit) उधाण आलं आहे.

“हा पक्षाचा विषय नाही हा आस्थेचा विषय आहे. अयोध्येत मी रामाच्या दर्शनाला आलो आहे. पक्ष वेगळा आणि आस्था वेगळी आहे. काँग्रेस धर्माच्या नावाखाली राजकारण करत नाही. मी रोज माझ्या घरातून निघाल्यानंतर मारुती आणि गजानन महाराजांचे दर्शन घेतो”, असं सुनील केदार म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिर निर्माणावर महत्त्वाची भूमीका जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे कोणती भूमीका जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, अनेक नेते आणि पदाधिकारीही अयोध्येला रवाना झाले आहेत. विशेष रेल्वेने शिवसैनिक अयोध्येते पोहोचले आहेत.

असा असेल अयोध्या दौरा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी दोन वाजता लखनऊ विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते गाडीने लखनऊ ते अयोध्या प्रवास करतील. दुपारी 3.30 वाजता अयोध्येत त्यांची पत्रकार परिषद होईल.

त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता उद्धव ठाकरे रामललाचे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते पुन्हा लखनऊकडे रवाना होतील.

संबधित बातम्या :

ग्राऊंड रिपोर्ट – अयोध्या : ‘बालासाहब का बेटा आ रहा हैं’

उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, अयोध्येतील महंतांची धमकी

अयोध्येला जाताना हे लक्षात ठेवा, संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *