Diwali: ‘दिवाळी हा मानव निर्मित‍ रोग…’, आता काँग्रेसच्या खासदाराने तोडले अकलेचे तारे, वक्तव्याने मोठा वाद

Imran Masood on Diwali Festival: फटाके फोडल्याने रोगराई दूर होते असे अकलेचे तारे भाजपच्या आमदार पापिया अधिकारी यांनी केले होते, तर दुसरीकडे आता दिवाळी हा मानव निर्मित रोग असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस खासदाराने केले आहे.

Diwali: दिवाळी हा मानव निर्मित‍ रोग..., आता काँग्रेसच्या खासदाराने तोडले अकलेचे तारे, वक्तव्याने मोठा वाद
'दिवाळी हा मानव निर्मित‍ रोग...', आता काँग्रेसच्या खासदाराने तोडले अकलेचे तारे
| Updated on: Nov 10, 2026 | 11:31 AM

Imran Masood on Diwali Festival: फटाके फोडल्याने देशभरात हवेची गुणवत्ता खालवली आहे. तर दुसरीकडे दिवाळीवरून राजकारण दूषित झाले आहे. फटाके फोडल्याने रोगराई दूर होते असे अकलेचे तारे पश्चिम बंगालमधील भाजपच्या आमदार पापिया अधिकारी यांनी केले होते, तर दुसरीकडे आता दिवाळी हा मानव निर्मित रोग असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी केले आहे. यामुळे दिवाळी सणावरून राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.

फटाके फोडल्याने रोगराई दूर होते

Loading...

फटाके फोडल्याने रोगराई दूर होते असे वक्तव्य केल्यानंतर पश्चिम बंगालच्या भाजप आमदार पापिया अधिकारी यांच्यावर टीकेची झोड उठली. दिल्लीसह देशातील अनेक शहरातील हवेची गुणवत्ता कमी झाली आहे. जगातील १०० प्रदूषित शहरातील ९३ शहरं ही भारतातील आहेत. पापिया अधिकारी यांनी असे अकेलेचे तारे तोडल्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला. तर त्याचवेळी काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी दिवाळी सणाविषयी केलेल्या टिप्पणीने वाद निर्माण झाला आहे.

दिवाळी हा मानवनिर्मित रोग

दिल्ली आणि एनसीआरमध्ये दिवाळीत फटाके फोडल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले आहे. काँग्रेसचे लोकसभेतील खासदार इम्रान मसूद यांनी दिवाळी आणि वायू प्रदूषणाचा संदर्भ देताना विखारी विचार मांडले. दिवाळी हा मानवनिर्मित रोग असल्याचे अकलेचे तारे त्यांनी सुद्धा तोडले. त्यांच्या या वक्तव्याने केवळ राजकीयच नाही तर धार्मिक वातावरणही ढवळून निघाले. त्यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. प्रदूषणाआड मसूद हे हिंदूंच्या सणावर टीका करत असल्याचा सूर आता उमटू लागला आहे. यामुळे काँग्रेसही अडचणीत आली आहे.

सामान्य नागरिकांनी समोर यावे

पदूषणाच्या समस्येवर बोलताना काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी नागरिकांनाही मोठे आवाहन केले आहे. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता आता नागरिकांनी स्वतःहून जागरूक होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी समाज आणि जनतेने स्वतःहून पुढाकार घेण्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचे वादग्रस्त वक्तव्य

नागरिकांच्या जागरुकतेवर भर

प्रदूषणाच्या समस्येवर बोलताना काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी स्पष्ट केले की, या समस्येचा सामना करण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही, तर नागरिकांनी स्वतःहून जागरूक होण्याची नितांत गरज आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी समाज आणि जनतेने स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर यावेळी विरोधकांना उत्तर देताना, हे लोक मेंटली डिस्टर्ब आहेत आणि ते केवळ नकारात्मक गोष्टी बोलतात असे वक्तव्य त्यांनी केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us