
नवी दिल्लीः अध्यक्षपदाची निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष करण्याचा दावा काँग्रेस नेते करत आहेत. मात्र बुधवारी झालेल्या मतमोजणीवेळी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आंध्र प्रदेशात पत्रकार परिषद घेत असतानाच त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, प्रत्येक सदस्य पक्षाध्यक्षांना अहवाल देत असतोच. त्यामुळे पक्षातील माझी भूमिकाही तेच ठरवतील. त्यामुळे पक्षातील माझ्याविषयीचे तुम्ही मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांनाही विचारु शकता असंही स्पष्ट त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष हे पक्षातील सर्वोच्च पद असल्याने त्यांना सर्वाधिकारही आहेत. नवे अध्यक्ष पक्षातील त्यांची भूमिका ठरवतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राहुल गांधींनी पक्ष आणि पक्षाच्या ध्येयधोरणाविषयी माहिती सांगतानाच त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच राहुल गांधींनी खरगे यांचे नाव घेत खरगे यांनी ठरवायचे आहे असंही ते म्हणाले.
त्यानंतर मात्र त्यांनी आपले शब्द दुरुस्त करत त्यांनी सांगितले की, पक्षाध्यक्ष म्हणून कोणाची निवड होईल, ते लवकरच समजेल असंही ते म्हणाले.
खरगे आणि थरूर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ते अफाट अनुभव आणि समजूतदार नेते आहेत, त्यामुळे त्यांना माझ्या सल्ल्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी खरगे यांचे नाव घेतल्यानंतर काही वेळातच निकाल जाहीर झाला. आणि खरगे यांना अधिकृतपणे अध्यक्ष म्हणून घोषितही करण्यात आले.
निवडणुकीत खरगे यांना 7,897 मते मिळाली तर शशी थरूर यांना 1,072 मते मिळाली होती. निवडणूक जिंकल्यानंतर 24 वर्षांनंतर खरगे हे पहिले गांधी घराण्याबाहेरचे अध्यक्ष बनले आहेत.
मल्लिकार्जुन खरगे यांचीर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याआधीच व अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी शशी थरूर यांनी आपला पराभव मान्य करत खरगे यांचे अभिनंदन केले.
जाहीर केलेल्या निवेदनात थरूर यांनी सांगितले की, अंतिम निकाल खरगे यांच्या बाजूने लागला असून काँग्रेसच्या निवडणुकीत त्यांच्या विजयाबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. त्यांनी सांगितले की खरगे यांना 7,897 आणि थरूर यांना 1,072 मते मिळाली.
यावेळी मिस्त्री यांनी सांगितले की निवडणुकीत 9,385 मते पडली आणि त्यापैकी 416 मते अवैध ठरली आहेत.