पिक्चर अभी बाक़ी है ब्रो.. काँग्रेसचा सरकारला इशारा, थेट घेतला मोठा निर्णय, सर्व खासदारांना..
डिलिमिटेशन बिलावरून काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे. ऐनवेळी शरद पवारांनी इंडिया आघाडीची साथ सोडली. मात्र, तरीही इंडिया आघाडीचा विश्वास कायम आहे. नुकताच काँग्रेसने मोठा निर्णय घेतला. यासोबतच सरकारला इशाराही दिला.

डिलिमिटेशनवरून घडामोडी वाढल्या आहेत. राहुल गांधी चैन्नईकडे रवाना झाले. काल इंडिया आघाडीच्या खासदारांची दिल्लीत बैठक झाली. पण या बैठकीला इंडिया आघाडीतील घटक असलेल्या शरद पवारांच्या पक्षाने पाठ फिरवली. डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यात आपण सरकारला मदत करणार असल्याचे मोठे विधान पवारांच्या पक्षाचे नेते असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी केले. त्यातच सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली. आपल्या खासदारांसोबत सुप्रिया सुळे दिल्लीत दाखल होती, त्यानंतर त्यांच्यासोबत बैठक होईल. ठाकरेंसह मविआचे बडे नेते शरद पवार यांच्यावर टीका करत आहे. कोणताही पद्धतीने शरद पवार यांना सत्ता हवी असते, असे मोठे आरोपही करण्यात आली. शरद पवार सध्या रूग्णालयात आहेत. त्यामुळे सर्व भूमिका सुप्रिया सुळे याच पार पाडणार आहेत.
त्यातच डिलिमिटेशन बिलाकरिता सर्वच पक्ष सावध भूमिका घेत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने बैठकीचे आयोजन केले. त्यांनी आपल्या पक्षातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांना देखील व्हीप जारी केले. हे खासदार शिवेसना शिंदे गटात आहेत. हे खासदार डिलिमिटेशन बिलाकरिता मतदान करणार आहेत, त्यापूर्वी ठाकरेंनी मोठा गेम केला असून 6 खासदारांना व्हिप जारी केले.
त्यातच शिवसेनेनंतर काँग्रेसनेही आपल्या खासदारांना व्हीप जारी केला. लोकसभेतील सर्व खासदारांसाठी हा व्हीप जारी केला. हा व्हीप 3 ओळींचा जारी करण्यात आला. कोणताही खासदार फुटू नये, याकरिता हे व्हीप जारी केले जाते. 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. कोणीही गैरहजर राहू शकत नाही.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांची याबाबत सूचक ट्वीट केले आहे. ‘पिक्चर अभी बाक़ी है ब्रो’ असा आशय लिहित त्यांनी हे ट्वीट जारी केले. त्यांनी एकप्रकारे मोठा इशारा सरकारला दिल्याचे बघायला मिळत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट ‘पिक्चर अभी बाक़ी है ब्रो म्हटल्याने काँग्रेस पुढे नक्की काय करणार यावर जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. काँग्रेसने या विधेयकाविरोधात भूमिका घेतली.