Corona Effect : महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना मध्य प्रदेशात बंदी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय

| Updated on: Mar 18, 2021 | 11:54 PM

महाराष्ट्रात गुरुवारी तब्बल 25 हजार 833 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. अशावेळी मध्य प्रदेश सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर 20 मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Corona Effect : महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना मध्य प्रदेशात बंदी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसवर बंदी घालण्याचा मध्य प्रदेश सरकारचा निर्णय
Follow us on

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोकं वर काढत आहे. विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात गुरुवारी तब्बल 25 हजार 833 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. अशावेळी मध्य प्रदेश सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर 20 मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Decision to ban buses coming from Maharashtra in Madhya Pradesh)

गुरुवारी मध्य प्रदेशात कोरोनाचे 917 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या आकड्यानंतर राज्यात एकूण कोरोनारुग्णांची संख्या 2 लाख 71 ङजार 957 झाली आहे. मध्य प्रदेशात सध्या 6 हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रोज हजारोच्या संख्येनं रुग्ण वाढत आहे. गुरुवारी महाराष्ट्रात तब्बल 25 हजार 833 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे.

कोरोना आढावा बैठकीत निर्णय

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत 20 मार्चपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लोक आपल्या खासगी वाहनानं येऊ-जाऊ शकतात. बसेसवर घालण्यात आलेली बंदी कधीपर्यंत असेल हे परिस्थिती पाहून ठरवण्यात येईल, असं मध्य प्रदेश सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

कर्नाटकात जाण्याची कोरोना चाचणी बंधनकारक

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाय उपायांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनेसुद्धा प्रवासासंबंधीचे नियम कडक केले आहे. कर्नाटक सरकारने नुकतंच माहाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटमध्ये प्रवेशबंदी केली आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने प्रवेशबंदी केली आहे. केवळ 72 तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून प्रत्येक प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जातोय. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना परत पाठवले जात आहे. कोगनोळी नाक्यावर या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यामुळे अचानक तपासणी सुरू करण्यात आल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रवाशांना रांगेत तास न् तास अडकून राहवं लागत आहे. तसेच काही प्रमाणात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, 25 हजार 833 नवे रुग्ण! कोणत्या शहरात चिंताजनक स्थिती?

Nashik Corona New Strain : नाशिककरांनो काळजी घ्या! दुबई आणि युरोपातील कोरोना स्ट्रेनचे 5 रुग्ण!

Decision to ban buses coming from Maharashtra in Madhya Pradesh