Nashik Corona New Strain : नाशिककरांनो काळजी घ्या! दुबई आणि युरोपातील कोरोना स्ट्रेनचे 5 रुग्ण!

नाशिकमध्ये 20 जणांचे अहवाल NAV कडे पाठवण्यात आले होते. त्यातील 5 जणांचे कोरोना अहवालात दुबई आणि युरोपातील स्ट्रेन आढळून आला आहे.

Nashik Corona New Strain : नाशिककरांनो काळजी घ्या! दुबई आणि युरोपातील कोरोना स्ट्रेनचे 5 रुग्ण!
नाशिकमध्ये दुबई आणि युरोपातील कोरोनाचा नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक : नाशिकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. नाशिकमधील 5 जणांचे कोरोना रिपोर्ट दुबई आणि युरोपमधील स्ट्रेनचे असल्याचं समोर आलंय. नाशिकमध्ये 20 जणांचे अहवाल NAV कडे पाठवण्यात आले होते. त्यातील 5 जणांचे कोरोना अहवालात दुबई आणि युरोपातील स्ट्रेन आढळून आला आहे. नाशिकमध्ये विदेशातील स्ट्रेन आढळून आल्यामुळे महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. शहरात यापूर्वीच कोरोना रुग्ण संख्येनं 9 हजाराचा आकडा गाठला आहे.(5 patients of Corona strain from Dubai and Europe were found in Nashik)

नाशिकमध्ये दुबई आणि युरोपमधील कोरोनाचा स्ट्रेन आढळल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. नाशिकमध्ये कोरोना चाचण्याचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे नाशिकमधील रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नाशिककरांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं बनलं आहे.

भुजबळांचा सूचक इशारा

नाशिकमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. अशावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. सरकारनं दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जात आहे. कारवाई केली तर ती फार कठोर असेल. अनिश्चित काळासाठी दुकानं बंद करण्याची कारवाई होऊ शकते, असं भुजबळ म्हणाले.

“दुर्दैवाने कोरोनाची दुसली लाट आली हे नक्की आहे. नाशिकला 10 हजार 800 कोरोना रुग्ण आहेत. यंत्रणा कामाला लागलेली आहे. 15 मार्च रोजी पॉझिटिव्हिटीचा दर 41 टक्के होता, आता तो 32 टक्क्यांवर आहे. चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात एका दिवसात 5 हजार स्वॅब तपासण्याची व्यवस्था केली आहे. रोज 20 हजार तपासण्या होण्याची क्षमता आहे. पण लोक तिथपर्यंत गेले तरच उपयोग होणार आहे”, असं भुजबळ म्हणालेत.

‘व्यासवायिक, भाजी मार्केटमध्ये मोठा गैरफायदा’

छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खंतही व्यक्त केलीय. सरकारनं दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जातोय. व्यावसायिक आणि भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला जात असल्याचं भुजबळ म्हणाले. अशावेळी कारवाई केली तर ती फार कठोर असेल. अनिश्चित काळासाठी दुकानं बंद करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा भुजबळांनी दिला आहे. तसंच कोणती लस घेतली. याची माहिती सल घेणाऱ्यानं ठेवायलाच हवी. 28 दिवसानंतर पुन्हा तोच डोस घेणं आवश्यक आहे. मंगल कार्यालय, आदी परवानगी अशलेल्या कार्यक्रमांना घातलेली बंधणं पाळणं आवश्यक आहे. नाहीतर सरकारचा नाईलाज होईल, असंही भुजबळ म्हणाले.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, 25 हजार 833 नवे रुग्ण! कोणत्या शहरात चिंताजनक स्थिती?

पाच ते साडेपाच हजारात मिळणारं रेमडेसीवीर इंजेक्शन जालन्यात अवघ्या 1400 रुपयात मिळणार

5 patients of Corona strain from Dubai and Europe were found in Nashik

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI