Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, 25 हजार 833 नवे रुग्ण! कोणत्या शहरात चिंताजनक स्थिती?

स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कठोर निर्बंधाचे निर्णय घेतले जात आहे. प्रशासनानं निर्बंध घातले असले तरी रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. राज्यातील काही शहरांतील कोरोना स्थितीचा आढावा आपण इथे घेणार आहोत.

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, 25 हजार 833 नवे रुग्ण! कोणत्या शहरात चिंताजनक स्थिती?
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 8:35 PM

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं आता पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. मोठा शहरांमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कठोर निर्बंधाचे निर्णय घेतले जात आहे. प्रशासनानं निर्बंध घातले असले तरी रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. राज्यातील काही शहरांतील कोरोना स्थितीचा आढावा आपण इथे घेणार आहोत.(What is the status of corona in Pune, Nagpur, Nanded, Washim, Sangli Osmanabad districts?)

दिवसभरात 25 हजार 833 नवे रुग्ण

राज्यात आज दिवसभरात तब्बल 25 हजार 833 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नवीन वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती आता चिंताजनक होताना दिसत आहे. दिवसभरात 12 हजार 764 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 1 लाख 66 हजार 353 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

पुण्यातील कोरोना स्थिती –

पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतच 5 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात पुणे शहरातील रुग्णसंख्या 2 हजार 500 पेक्षा जास्त होती. तर पिंपरी-चिंचवड मध्ये जवळपास 1 हजार 200 रुग्ण सापडले होते. त्यामुळे आता पुण्यातील कोरोना पाझिटिव्हिटीचा दर 25 टक्क्यांच्या पुढे जाऊन पोहोचला आहे. रात्रीपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान बुधवारी एकाच दिवसांत 2 हजार 587 अशी उच्चांकी रुग्णसंख्या आढळून आली होती.

नागपुरातील कोरोना स्थिती –

नागपुरात आज पुन्हा एकदा कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात तब्बल 3 हजार 796 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात आज कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 1 हजार 277 रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. नागपुरातील एकूण रुग्णसंख्येचा आढावा घेतला तर 1लाख 82 हजार 552 रुग्ण आतापर्यंत आढळून आले. त्यातील 1लाख 54 हजार 410 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. तर आतापर्यंत 4 हजार 528 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असूनही रस्त्यावर फिरणाऱ्या रुग्णांना 5 हजाराचा दंड ठोठावत महापालिका आयुक्तांनी दणका दिला आहे. नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गृह विलगीकर नियमांचे पालन न करणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाला 5 हजाराचा दंड केलाय. हा रुग्ण घराबाहेर फिरत होता.

सांगलीतील कोरोना स्थिती –

सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 76 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 40 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात 500 हून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

नांदेडमधील कोरोना स्थिती –

नांदेडमध्ये गेल्या 24 तासांत 625 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. हा जिल्ह्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता 3 हजार 728 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 627 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 51 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

वाशिममधील कोरोना स्थिती –

वाशिम जिल्ह्यात आज दिवसभरात 203 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 117 जण कोरोनातून मुक्त झालेत. जिल्ह्यात आज 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जिल्ह्यात गेल्या 22 दिवसांत 4 हजार 71 कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या जिल्ह्यात 1 हजार 440 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

उस्मानाबादमधील कोरोना स्थिती –

उस्मानाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात 164 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात उस्मानाबाद तालुक्यात 45, कळंब तालुक्यात 59, उमरगा तालुक्यात 15 तर परंडा तालुक्यात 14 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सध्या 663 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या :

Washim Corona Update | वाशिम जिल्ह्यात संचारबंदी, सिनेमागृह, हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास मुभा

Nashik Corona Update : कोरोनाची दुसरी लाट आली हे नक्की, सवलतींचा गैरफायदा घेऊ नका, भुजबळांचं आवाहन

What is the status of corona in Pune, Nagpur, Nanded, Washim, Sangli Osmanabad districts?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.