दिल्लीसह महाराष्ट्रातही कोरोना धोकादायक; रुग्णसंख्या झपाट्याने वाढली….

| Updated on: Apr 20, 2023 | 12:07 AM

महाराष्ट्रातील कोरोनाशी संबंधित अपडेट्स पाहिल्यास राज्यात 16 हजार 829 लोकांच्या कोरोना चाचण्या केल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्‍यांच्‍याकडून 1100 नवे कोरोनाचे रुग्ण दाखल झाले आहेत.

दिल्लीसह महाराष्ट्रातही कोरोना धोकादायक; रुग्णसंख्या झपाट्याने वाढली....
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती प्रचंड बिघडत चालली आहे. रोज नवे रुग्ण मिळत असल्याने आरोग्य विभागही आता सतर्क झाला आहे. राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रातही कोरोनाचा संसर्ग प्रचंड झपाट्याने पसरत आहे. बुधवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 1 हजार 100 नवीन रुग्ण आढळले. तर यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आज कोरोनाचे नवी रुग्ण मिळाले असून त्यांची संख्या 1 हजार 767 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही 6 वर पोहोचला आहे.

देशाच्या राजधानीत आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दररोज 250 हून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. तर बुधवारी या प्रकरणात काहीसा दिलासाही मिळाला आहे. बुधवारी मुंबईत 234 नवीन रुग्ण आढळले आहेत.

तर यापैकी 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामधील 5 रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढले असून मुंबईतही 319 रुग्ण बरे झाले असून त्यांना आता घरी सोडून देण्यात आले आहे.

दिल्लीत 19 एप्रिल रोजी कोरोनाचे 1 हजार 767 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 18 एप्रिल रोजी कोरोनाचे 1 हजार 537 नवीन रुग्ण आढळले होते. तसेच बुधवारी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगिते.

एका दिवसापूर्वी तो 26.54 टक्के होता, तो वाढून 28.63 टक्के झाला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, आज केवळ 2 रुग्णांच्या मृत्यू हे कोरोनाने झाल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाशी संबंधित अपडेट्स पाहिल्यास राज्यात 16 हजार 829 लोकांच्या कोरोना चाचण्या केल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्‍यांच्‍याकडून 1100 नवे कोरोनाचे रुग्ण दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. त्या कोरोना रुग्णांची संख्या आता 1 हजार 591, 1 हजार 009 आणि 766 आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रातील 8 कोटी 68 लाख 33 हजार 770 लोकांची कोरोनाची चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत 81 लाख 58 हजार 393 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.