Corona Vaccine : कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला लसीकरणासाठी 9 महिने थांबावं लागणार? जाणून घ्या

| Updated on: May 18, 2021 | 3:35 PM

यापूर्वी NIAGI ने कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी 6 महिन्यानंतर कोरोनाची लस घ्यावी असं सांगण्यात आलं होतं. पण आता हे अंतर 9 महिन्यापर्यंत वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Corona Vaccine : कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला लसीकरणासाठी 9 महिने थांबावं लागणार? जाणून घ्या
कोरोना लसीकरण प्रतिकात्मक फोटो
Follow us on

मुंबई : तुम्ही नुकतेच कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहात आणि तुम्ही कोरोनाची लस टोचून घेण्याच्या विचारात आहात, तर थोडं थांबा. कारण कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लस घेण्यासाठी 6 ते 9 महिन्याचं अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला एका NIAGI अर्थात The National Technical Advisory Group on Immunisation ने दिला आहे. यापूर्वी NIAGI ने कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी 6 महिन्यानंतर कोरोनाची लस घ्यावी असं सांगण्यात आलं होतं. पण आता हे अंतर 9 महिन्यापर्यंत वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (A person who has recovered from corona should be vaccinated after 9 months)

दरम्यान, NIAGI च्या या सल्ल्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यामुळे ही सूचना आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. NIAGI ने हा सल्ला देण्यापूर्वी कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसबाबतही महत्वाची सूचना केली होती. कोविशील्ड लसीच्या दोन्ही डोस मधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर सरकारकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यापूर्वी कोविशील्ड लसीचा दुसरा डोस 4 ते 8 आठवड्यानंतर म्हणजे साधारणपणे 45 दिवसांनंतर दिला जात होता.

कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी झालेली नोंदणी कायम राहणार

कोविशील्ड लसीबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. ज्या नागरिकांनी कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी यापूर्वीच नोंदणी केली होती, त्यांची नोंदणी कायम राहणार आहे. म्हणजे ते आधी मिळालेल्या तारखेलाच दुसरा डोस घेऊ शकणार आहेत. मात्र, आता नोंदणी करणाऱ्या नागरिकांना नव्या नियमानुसारच दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागणार आहे. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर आधी 6 ते 8 आठवडे होतं. भारतात आता या लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आलं आहे. कोविड वर्किंग ग्रुपने त्याबाबत शिफारस केली होती.

कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ICMR आणि AIIMS यांनी प्लाझ्मा थेरपीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्यात आलीय. यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआरने नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्यात. कोविड 19 वरील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वतीनं एक बैठक घेण्यात आलीय. त्या बैठकीला अनेक सदस्य उपस्थित होते. या बैठकीतच प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीपासून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि बर्‍याचदा हे अयोग्यपद्धतीने वापरली गेल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं.

प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक

ICMR चे वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा म्हणाले की, बीजेएममध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून प्लाझ्मा थेरपीचा कोणताही फायदा नसल्याचे समोर आले. प्लाझ्मा थेरपी महाग आहे आणि यामुळे भीती निर्माण होत आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेवर ओझे वाढले असूनही रुग्णांना मदत होत नाही. दात्याच्या प्लाझ्माच्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही. प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक आहे, परंतु हे निश्चित नसते.

संबंधित बातम्या :

Covid-19: कोरोनाच्या उपचारात गेमचेंजर औषध; दिल्लीच्या ‘एम्स’ला मिळाली पहिली बॅच

Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, चार लाखांहून अधिक डिस्चार्ज, मृतांचा आकडा मात्र 4300 च्या पार

A person who has recovered from corona should be vaccinated after 9 months