Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, चार लाखांहून अधिक डिस्चार्ज, मृतांचा आकडा मात्र 4300 च्या पार

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 वर गेला आहे. (New Corona Cases 24 hours)

Corona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, चार लाखांहून अधिक डिस्चार्ज, मृतांचा आकडा मात्र 4300 च्या पार
New Corona Cases 24 hours

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी घट (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 2 लाख 63 हजार 533 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आदल्या दिवसाच्या तुलनेत 18 हजारांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा वाढला असून तब्बल 4 हजार 329 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. (New 263533 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 63 हजार 533 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 329 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 4 लाख 22 हजार 436 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचा आकडा चार लाखांच्या पार गेला आहे.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 78 हजार 719 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात 2 कोटी 15 लाख 96 हजार 512 रुग्ण बरे झाले आहेत. तर 33 लाख 53 हजार 765 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 18 कोटी 44 लाख 53 हजार 149 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या दिवसात 15 लाख 26 हजार 689 जणांना लसीकरण करण्यात आले.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,63,533

देशात 24 तासात डिस्चार्ज – 4,22,436

देशात 24 तासात मृत्यू – 4,329

एकूण रूग्ण – 2,52,28,996

एकूण डिस्चार्ज – 2,15,96,512

एकूण मृत्यू – 2,78,719

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 33,53,765

कालच्या दिवसात लसीकरण – 15,26,689

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 18,44,53,149  (New Corona Cases 24 hours)

India reports 2,63,533 new #COVID19 cases, 4,22,436 discharges and 4,329 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry

Total cases: 2,52,28,996
Total discharges: 2,15,96,512
Death toll: 2,78,719
Active cases: 33,53,765

Total vaccination: 18,44,53,149 pic.twitter.com/75fXkY6Xjh

— ANI (@ANI) May 18, 2021

संबंधित बातम्या :

पुणे जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरण्याचे संकेत, बाधितांच्या संख्येत मोठी घट

नाशिकमध्ये लहान मुलांना कोरोनाचा विळखा, मनपा लस खरेदी करण्याच्या तयारीत

(New Corona Cases 24 hours)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI