AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, नव्या बाधितांचा आकडा तीन लाखांच्या खाली

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 81 हजार 386 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे (New Corona Cases 24 hours)

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, नव्या बाधितांचा आकडा तीन लाखांच्या खाली
Maharashtra Corona Virus
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 17, 2021 | 9:55 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी घट (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 2 लाख 81 हजार 386 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 106 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. (New 281386 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या आठवड्यात 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 81 हजार 386 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 106 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 78 हजार 741 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 74 हजार 390 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात 2 कोटी 11 लाख 74 हजार 76 रुग्ण बरे झाले आहेत. तर 35 लाख 16 हजार 997 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 18 कोटी 29 लाख 26 हजार 460 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या दिवसात 6 लाख 91 हजार 211 जणांना लसीकरण करण्यात आले.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,81,386

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,78,741

देशात 24 तासात मृत्यू – 4,106

एकूण रूग्ण – 2,49,65,463

एकूण डिस्चार्ज – 2,11,74,076

एकूण मृत्यू – 2,74,390

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 35,16,997

कालच्या दिवसात लसीकरण – 6,91,211

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 18,29,26,460 (New Corona Cases 24 hours)

संबंधित बातम्या :

 कोविशील्डबाबत महत्वाची घोषणा, दुसऱ्या डोससाठी झालेली नोंदणी कायम राहणार

कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना नव्या आजाराचा धोका, नागपूरमध्ये रुग्ण वाढले

(New 281386 Corona Cases in India in the last 24 hours)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?