Corona vaccine : कोविशील्डबाबत महत्वाची घोषणा, दुसऱ्या डोससाठी झालेली नोंदणी कायम राहणार

ज्या नागरिकांनी कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी यापूर्वीच नोंदणी केली होती, त्यांची नोंदणी कायम राहणार आहे.

Corona vaccine : कोविशील्डबाबत महत्वाची घोषणा, दुसऱ्या डोससाठी झालेली नोंदणी कायम राहणार
कोविशील्ड

मुंबई : कोविशील्ड (Covishield) या कोरोना लसीच्या 2 डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. त्यासंबंधी बदल आता कोविन पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर कोविशील्ड लसीबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. ज्या नागरिकांनी कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी यापूर्वीच नोंदणी केली होती, त्यांची नोंदणी कायम राहणार आहे. म्हणजे ते आधी मिळालेल्या तारखेलाच दुसरा डोस घेऊ शकणार आहेत. मात्र, आता नोंदणी करणाऱ्या नागरिकांना नव्या नियमानुसारच दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागणार आहे. (Previous registration for the second dose of covishield will be maintained)

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर आधी 6 ते 8 आठवडे होतं. भारतात आता या लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आलं आहे. कोविड वर्किंग ग्रुपने त्याबाबत शिफारस केली होती.

लसीच्या उत्पादनात गती आणण्याचे प्रयत्न सुरु

देशात सध्या कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे. अशावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी सांगितलं की, कोरोना लसीची मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादनात गती आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या भारतातील दोन कोरोना लस निर्मिती कंपन्या आहेत त्यांनी आतापर्यंत देशात लसीचा मोठा पुरवठा केला आहे आणि तो सातत्याने जारी आहे.

दुसऱ्या डोसबाबतची माहिती कोविन अॅपवर अपडेट

कोविन या कोरोना लसीकरणासाठी नोंदणी केली जाणाऱ्या अॅपवर आता कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतराची माहिती बदलण्यात आली आहे. कोवॅक्सीनचा दुसरा डोस तुम्ही 28 ते 42 दिवसानंतर घेऊ शकता. तर कोविशील्ड पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर 84 ते 112 दिवस असायला हवं. यासोबतच आता रशियाच्या स्फुटनिक लसीबाबतही सांगण्यात आलं आहे. कारण, डॉ. रेड्डीज स्फुटनिकचं लसीकरणही सुरु करत आहे. या लसीच्या दोन डोसमधील असंतर 21 ते 90 दिवसांचं असणार आहे.

कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर आता वाढवण्यात आलं आहे. देशभरात अनेक ठिकाणी कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) कोरोना लसीच्या तुटवड्यावरुन अनेक शिफारसी केल्या होत्या. यानुसार कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यापर्यंत वाढवण्याची सूचना दिली होती. तसेच ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांनी सहा महिन्यांनंतर लस घ्यावी, असेही यात म्हटलं होतं. त्यानुसार कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

Cyclone in Mumbai : मुंबईत सोमवारी कोरोना लसीकरण पूर्णत: बंद, तौत्के चक्रीवादळामुळे महापालिकेचा निर्णय

नागपुरात 10 झोनमध्ये 6 हजार सुपर स्प्रेडर्सची तपासणी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेचं पाऊल

Previous registration for the second dose of covishield will be maintained