Corona Virus : पंजाबमध्ये 81 टक्के रुग्णांमध्ये UK व्हेरिएंट!, युवकांनाही लसीकरणाची परवानगी द्या – अमरिंदर सिंग

| Updated on: Mar 23, 2021 | 4:37 PM

पंजाबसाठी एक अतिशय चिंताजनक बाब समोर आली आहे. पंजाब सरकारने तपासणीसाठी पाठवलेल्या 401 नमुन्यांपैकी 81 टक्के नमुन्यांमध्ये UKतील स्ट्रेन आढळून आला आहे.

Corona Virus : पंजाबमध्ये 81 टक्के रुग्णांमध्ये UK व्हेरिएंट!, युवकांनाही लसीकरणाची परवानगी द्या - अमरिंदर सिंग
Follow us on

नवी दिल्ली : पंजाबमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशावेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी युवकांनाही लसीकरणाची परवानगी द्या, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर पंजाबसाठी एक अतिशय चिंताजनक बाब समोर आली आहे. पंजाब सरकारने तपासणीसाठी पाठवलेल्या 401 नमुन्यांपैकी 81 टक्के नमुन्यांमध्ये UKतील स्ट्रेन आढळून आला आहे.(UK variant of the Corona was found in 81 percent of the samples)

पंजाब मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठकुराल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यामुळे युवक मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधानांकडे विनंती केली आहे. सध्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. पण युवकांनाही लस देण्याची परवानगी पंजाब सरकारने मागितली आहे.

UK व्हेरिएंट B117 विषाणू अधिक घातक

UK व्हेरिएंट B117 विषाणू अधिक घातक आहे. पंजाबमधील 401 नमुन्यांमधील जीनोम सक्वेन्सिंगची तपासणी नुकतीच करण्यात आली. त्यातील 81 टक्के नमुन्यांमध्ये B117 विषाणू आढळून आला आहे. यूके स्ट्रेन अत्यंत घातक असून, सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणालेत.

45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस

येत्या एक एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. 45 वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहन जावडेकरांनी केलं. आतापर्यंत केवळ सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती.

वयाचे निकष काय?

वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे सध्या लसीकरण करण्यात येत आहे. 45 ते 59 या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही तूर्तास लसीकरण सुरु आहे. या दोन्ही वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी 1 जानेवारी 2022 रोजीचे वय विचारात घेतले जात आहे. यानुसार आज ज्यांचे वय 59 वर्षे 3 महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तीचे वय 44 वर्षे 3 महिने असले तरीही त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे.

संबंधित बातम्या :

45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस, केंद्रीय कॅबिनेटची घोषणा

Corona Vaccine : ‘कोव्हिशिल्ड’च्या 2 डोसमधील अंतर वाढवलं, केंद्र सरकारची नवी गाईडलाईन्स

UK variant of the Corona was found in 81 percent of the samples