Corona Vaccine : ‘कोव्हिशिल्ड’च्या 2 डोसमधील अंतर वाढवलं, केंद्र सरकारची नवी गाईडलाईन्स

आता कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या नव्या गाईडलाईननुसार कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर आता 4 आठवड्यांऐवजी 6 ते 8 आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Corona Vaccine : 'कोव्हिशिल्ड'च्या 2 डोसमधील अंतर वाढवलं, केंद्र सरकारची नवी गाईडलाईन्स
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 7:32 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्याही वाढतेय. सरकारकडून लसीकरण मोहीमही अधिक वेगवान करण्यात आलीय. अशावेळी कोरोना लसीबाबत केंद्र सरकारने नवी गाईडलाईन जारी केली आहे. त्यानुसार आता कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या नव्या गाईडलाईननुसार कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर आता 4 आठवड्यांऐवजी 6 ते 8 आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Central Government’s decision to widen the gap between two doses of Covishield vaccine)

देशात सुरु असलेल्या लसीकरणासाठी सध्या दोन लसींचा वापर केला जात आहे. त्यात पहिली भारतातील लस निर्मिती कंपनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि दुसरी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड या लसींचा समावेश आहे. यात कोव्हिशिल्ड बाबत केंद्र सरकाने नवी गाईडलाईन जारी केली आहे. त्यानुसार कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस आता 4 आठवड्यांऐवजी 6 ते 8 आठवड्यानंतर दिला जाणार आहे.

दोन संस्थांचा अभ्यासपूर्ण अहवाल

नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन ईम्यूनायजेशन (NTAGI) आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फ़ॉर कोविड-19 या बैठकीत घेतलेल्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तसे करण्याचा सल्ला देण्यात आला. या सल्ल्याचा विचार करत केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्राने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य खात्याचं सर्व राज्यांना पत्र

कोविशिल्डचा दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान दिल्यास अधिक लाभदायक फायदे होतील असा तज्ञांचा अहवाल आहे. या संदर्भात, आज केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आतापासून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील अंतर किती असावे याचा उल्लेख केला आहे. सोबतच त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कोव्हॅक्सिनबाबत हा नियम लागू नाही

दरम्यान, कोव्हिशिल्ड लसीबाबत जारी केलेली गाईडलाईन ही कोव्हॅक्सिनबाबत लागू असणार नाही. म्हणजे ज्या लोकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यांना चार आठवड्यानंतरच दुसरा डोस दिला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown latest update : रुग्णसंख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन निश्चित, दोन दिवसांत निर्णय – राजेश टोपे

कोरोना लसीकरण: तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट आहे का? नसेल तर काय होणार?

Central Government’s decision to widen the gap between two doses of Covishield vaccine

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.