AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लसीकरण: तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट आहे का? नसेल तर काय होणार?

कोरोना लसीच्या नोंदणीसाठी आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट केलेला असणं आवश्यक आहे नसेल तर अपडेट करावा लागेल. (Adhar Card Corona Vaccination)

कोरोना लसीकरण: तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट आहे का? नसेल तर काय होणार?
आधार कार्ड बँक अकाऊंटला लिंक करा
| Updated on: Jan 11, 2021 | 12:20 PM
Share

नवी दिल्ली: भारत सरकारनं सीरम इनस्टिट्यूटची कोविशिल्ड (Covishield ), भारत बायोटेकची कोवॅक्सिन (Covaxin) आणि झायडस कॅडिलाच्या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारनं 16 जानेवारीपासून भारतात  कोरोना लसीकरण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोरोना लस दिली जाणार आहे. मात्र, कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करताना आपल्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट केला नसेल तर तुम्हाला लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया करता येणार नाही. (Mobile Number Update in Adhar Card is must in Corona Vaccination)

आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणं आवश्यक

कोरोना लसीकरणासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर केला जाणार आहे. याद्वारे सरकार नागरिकांचा यूनिक हेल्थ आयडी तयार करणार असून यामध्ये नागरिकांची आरोग्य विषयक माहिती एकत्र केली जाणार आहे. कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी तुमच्या आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट असणं आवश्यक आहे. जर मोबाईल नंबर अपडेट नसेल तर सरकारकडून लसीकरणासाठीचा एसएमएस तुम्हाला येणार नाही. 16 जानेवारीपासून लसीकरण प्रक्रिया सुरु होत असल्यामुळे तुम्हाला आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करुन घेणं आवश्यक आहे.

पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम 16 जानेवारीपासून सुरु होत आहे. भारतात कोरोना लसीकरणचा सर्वात मोठा कार्यक्रम राबवला जाईल. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. आजच्या संवादाद्वारे लसीकरणापूर्वी राज्यांची मतं जाणून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जाऊ शकते.

पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ठ

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ठ केंद्र सरकारनं ठेवलं आहे. यामध्ये 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या 16 मंत्रालयांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात आलंय.

संबंधित बातम्या:

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण, केंद्र सरकारची मोठी घोषणा

लस घेतलेल्या लाभार्थ्याच्या बोटावर शाई, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

(Mobile Number Update in Adhar Card is must in Corona Vaccination)

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.