देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण, केंद्र सरकारची मोठी घोषणा

येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:40 PM, 9 Jan 2021
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण, केंद्र सरकारची मोठी घोषणा

मुंबई : कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल. यामध्ये तब्बल 27 कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीरमनं उत्पादीत केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्स या दोन लसींचं लसीकरण करण्यात येणार आहे.

(corona Vaccination drive to kick off on 16th Jan 2021 central government announcement)

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून कोरोनाची ही लस सर्वसामान्यांना दिली जाईल. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वर्षभराच्या आतच भारताना कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. कोरोनाची ही लस सर्वात आधी डॉक्टर, नर्स यासारखे आरोग्य कर्मचारी, सैनिक यासारख्या कोरोना योद्धांना दिली जाणार आहे.

यानंतरच्या टप्प्यात कोरोना लस ही 50 हून अधिक वय असलेल्या किंवा 50 हून कमी वय आजारी असलेल्या व्यक्तींना दिली जाईल. संपूर्ण देशात येत्या दहा दिवसात कधीही कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होईल, अशीही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

आम्ही कोरोना लसीकरणासाठी तयार आहोत. मात्र लसीकरणाची अंतिम तारीख सरकारकडून निश्चित करण्यात येईल. डीसीजीआयने 2 आणि 3 जानेवारीला लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

लसीकरणासाठी तीन कोटी कोरोना योद्धांना प्राधान्य

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आरोग्य विभागातील कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केले. सैन्य दल आणि पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांना कोवीन अ‌ॅपवर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. सामान्य व्यक्तींना कोरोना लसीसाठी नोंदणी करावी लागेल.

लस प्रत्येक बूथवर पोहोचण्यासाठीची सिस्टम तयार

राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लस ही प्रत्येक बूथवर पोहोचण्यासाठी पूर्ण सिस्टम तयार करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक राज्याने यासाठी युनिट तयार केले आहे. यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो.

देशात चार ठिकाणी लसीचा साठा

मुंबई, कर्नाल, चेन्नई आणि कोलकातामध्ये या चार प्रमुख ठिकाणांवर कोरोना लसीकरणाचा साठा केला जाणार आहे. त्यानंतर 37 पुढील टप्प्यात लसीकरण ठिकाणांवर लस साठवली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. लसीच्या वाहतुकीसाठी विमानसेवेचा वापर केला जाणार आहे. (corona Vaccination drive to kick off on 16th Jan 2021 central government announcement)

लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज

दरम्यान, 16 जानेवारीपासून होणाऱ्या कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. “लसीकरणाची संपूर्ण तयारी राज्यात झाली आहे, ज्या क्षणाला केंद्र सरकार लसीची उपलब्धता करून देईल आम्ही लसीकरण सुरू करू. कोल्डचेनही तयार आहे, काही कमतरता आहे ती दूर करु. पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्यसेवकांना लस देऊ” असं राजेश टोपे म्हणाले.

संबंधित बातम्या – 

लस घेतलेल्या लाभार्थ्याच्या बोटावर शाई, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

(corona Vaccination drive to kick off on 16th Jan 2021 central government announcement)