कपलने छापली अशी लग्नपत्रिका, ते चार शब्द वाचून पाहुण्यांना फुटला घाम

आपलं लग्न हे विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या कायम लक्षात राहावं अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी काही तरी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न असतो. मात्र त्यात अनेकदा गडबड होते.

कपलने छापली अशी लग्नपत्रिका, ते चार शब्द वाचून पाहुण्यांना फुटला घाम
| Updated on: Feb 15, 2025 | 8:28 PM

प्रत्येकाला आपलं लग्न स्पेशल व्हावं असं वाटत असतं. सर्वसामान्यपणे लग्न आयुष्यात फक्त एकदाच होतं. त्यामुळे आपलं लग्न हे विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या कायम लक्षात राहावं अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी वर आणि वधू तसेच त्यांच्या कुटुंबियांकडून जोरदार तयारी केली जाते. लग्नासाठी तयार करण्यात आलेली प्रत्येक गोष्ट परफेक्ट कशी होईल याकडे वधू -वरच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांचं देखील लक्ष असतं. मात्र हे सर्व करत असताना काही गोष्टी आती होतात, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात गडबड होते. येणाऱ्या पाहुण्यांचा देखील अपमान होतो. अशीच एक लग्नपत्रिका सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

लग्न पत्रिकेत नेमकं काय छापलं आहे?

एक काळ होता, की लग्नासाठी लोक नॉर्मल लग्नपत्रिका छापायचे. कारण त्या काळात लोकांकडे दुसरा काही पर्याय नव्हता. मात्र आता काळ बदलला आहे. लोक लग्नपत्रिकेला आवश्यकतेपेक्षाही जास्त महत्त्व देऊ लागले आहेत. आपली लग्नपत्रिका इतरांपेक्षा वेगळी कशी बनेल यासाठी ते लग्नपत्रिकेत अनेक गोष्टींचा समावेश करतात. मात्र अनेकदा असं होतं की लग्नपत्रिका स्पेशल बनवण्याच्या नादात तिच्यामध्ये गडबड होते, आणि ती विनोदाचा विषय बनते.

 

अशीच एक पत्रिका व्हायरल झाली आहे, एका कपलने आपल्या लग्नाची पत्रिका छापली.मात्र ही पत्रिका वाचून लग्नाला आलेले पाहुणे घाबरले. हा आपला अपमान आहे की सन्मान असा प्रश्न त्यांना पडला.व्हायरल होत असलेल्या या लग्न पत्रिकेमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू -वराने आपल्या नावासोबतच आपली पदवी देखील बोर्ड अक्षरात छापली आहे. यामध्ये वराच्या नावापुढे त्याची डिग्री आयआयटी मुंबई तर वधूच्या नावापुढे तिची डिग्री आयआयटी दिल्ली अशी छापण्यात आली आहे.ही पत्रिका वाचून लग्नाला जाणारे पाहुणे देखील विचारात पडले आहेत, की लग्नाला जावं की नाही जावं, अनेकांनी तर आपली डिर्गी शोधण्यासाठी पुन्हा एकदा बंद कपाटात शोध मोहीम राबवली. ही पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे.