CoWin Portal: लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी शक्कल; एकाच मोबाईल क्रमांकवरून करा 6 सदस्यांची नोंदणी

| Updated on: Jan 22, 2022 | 9:37 AM

CoWin Portal वर आता 4 ऐवजी 6 सदस्यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. एकाच मोबाईल क्रमांकावरुन 6 सदस्यांची नोंद करता येणार आहे. 

CoWin Portal: लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी शक्कल; एकाच मोबाईल क्रमांकवरून करा 6 सदस्यांची नोंदणी
कोरोना लसीकरण
Follow us on

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारताने रेकॉर्ड ब्रेक लसीकरण मोहिम राबविली. त्याचा परिणाम ही दिसून आला. प्रतिकार क्षमता वाढल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाला काही प्रमाणात अटकाव करण्यात यश आले आहे. कोरोना विरुद्धची ही लढाई अधिक प्रखर करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली असून लसीकरणात येणा-या तांत्रिक अडचणींचा निपटारा करण्याचा धडका आरोग्य मंत्रालयाने लावला आहे. दुर्गम भागापासून ते द-या खो-यात राहणा-यांना लस द्यावी यासाठी प्रयत्न सुरु आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, एकाच मोबाईल क्रमांकावरुन 6 सदस्यांना को-विन पोर्टलवर (CoWin Portal) नोंदणीची परवानगी दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 4 सदस्यांपुरती मर्यादीत होती. मात्र ग्रामीण भागातील मोठ्या कुटुंबात केवळ एकाच मोबाईलचा वापर होतो. 4 सदस्यांची पूर्वीची मर्यादा अशा कुटुंबांसाठी अडचणी ठरत होती. सरकारने याविषयीचा बदल केला आहे.

सदस्य संख्या वाढली

लाभार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी को-विन पोर्टलवरच्या सेवा अद्ययावत करण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकाच मोबाईल क्रमांकावरुन 6 सदस्यांची नोंदणी सुलभ करण्यासाठी को-विन पोर्टल अद्ययावत करण्यात आले आहे. यापूर्वी एका मोबाईल क्रमांकावरुन 4 सदस्यांची नोंदणी करता येत होती. त्यात आता आणखी दोन सदस्यांची अधिकची नोंदणी करता येणार आहे. एकूण 6 सदस्यांची नोंदणी करता येणार आहे.

आवश्यक बदल करण्याची मुभा

सदस्याला कि-विनने आणखी काही सुविधा सुलभ केल्या आहेत. त्यानुसार, तुम्ही लसीचा एक डोस घेतला असेल अथवा दोन डोस घेतले असेल तर त्याविषयीची सद्यस्थिती (Status) सदस्य बदलू शकतो. त्यासंबंधीची योग्य माहिती मात्र त्याला द्यावी लागेल. मोबाईल क्रमांकाआधारे सत्यापन करुन ती माहिती अद्ययावत होईल. मध्यंतरी को-विन पोर्टलवर अनेक तांत्रिक गडबडी झाल्या आहेत. त्यामुळे तुमची लस घेतल्याची तारीख, नाव, पत्ता आणि इतर माहितीत बदल झाला असेल तर त्या सदस्याला मोबाईल क्रमांक सत्यापन करुन बदलविता येईल. त्याची मुभा आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यासाठी रेज अ इश्यू युटिलीटी या पर्यायचा वापर करता येईल. याठिकाणी संबंधित बदल सूचीत करुन 3 ते 7 दिवसांत लाभार्थ्याची माहिती अद्ययावत (Update) करता येते.

लसीकरणाचा उच्चांक

भारतात 20 जानेवारी 2022 पर्यंत 1.6 अब्ज लसीचे डोस देण्यात आले आहे. पूर्णपणे लसीकरण झालेली लोकसंख्या 67.2 कोटी आहे. हा आकडा 48.7 टक्के आहे. भारतात किमान एक डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 92 कोटी 20 लाख 87 हजार 216 एवढा आहे. हे प्रमाण 66.8 टक्के आहे. तर  63 लाख 92 हजार 578 जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. जगाभरात याच दिवशी 9.82 अब्ज लसींचा डोस देण्यात आला आहे. त्यात 4.07 अब्ज लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. हा आकडा 52.2 टक्के आहे.

इतर बातम्याः

Nashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया?

Nashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय?

Malegaon | 30 वर्षांपासून बंद असलेली खोली उघडली अन् मानवी कवटी, हाडे सापडली; मालेगावमध्ये खळबळ!