Petrol Diesel Price : भारताचा ज्याची भीती तेच घडले, जागतिक बाजारात खळबळ, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणन घ्या..

Petrol Diesel New Rate : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार अशी चर्चा जोरदार रंगताना दिसली. मात्र, यादरम्यानच आता मोठा झटका बसला. जागतिक बाजारात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची आशा मावळली आहे.

Petrol Diesel Price : भारताचा ज्याची भीती तेच घडले, जागतिक बाजारात खळबळ, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणन घ्या..
Petrol Diesel Price
| Updated on: Jul 08, 2026 | 8:05 AM

Petrol Diesel New Rate : इराण आणि अमेरिका यांच्यात जवळपास 3 महिने युद्ध सुरू होते. या युद्धाने मोठा हाहाकार उडाला. त्यानंतर काही देशांना या युद्धात मध्यस्थी करण्यात मोठे यश आले. या युद्धाचा परिणाम जगभरातील बाजारपेठेवर आला. थेट अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होताना दिसले. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजाराज कच्च्या तेलाचे भाव वाढले. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनली होती. होर्मुज खाडीत पुन्हा एकदा मोठा तणाव बघायला मिळाला. दोन जहाजांवर हल्ले झाली. अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आहे. पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढताना दिसत आहे. याच तणावात आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उघडताच कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठे बदल झाले. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. तब्बल 3 टक्क्यांनी कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या.

इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसल्या. कच्च्या तेलाच्या किमतीचे भाव गगणाला पोहोचले होते. युद्ध थांबल्यानंतर हे भाव कमी झाले. युद्धाच्या काळात भारत सरकारने एकदा दोनदा नाही तर तब्बल 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली. त्यानंतर आता या किमती कमी होणार असल्याचा अंदाज होता. मात्र, पुन्हा एकदा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली.

भारतात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करणाऱ्या सरकारी कंपन्यांनी बुधवार 8 जुलै 2026 जागतिक बाजाराज कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होऊनही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत होत्या. भारताच्या शेजारील देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी देखील केल्या.

पण भारताने दर कमी केले नाहीत. भारतीय तेल कंपन्यांनी आपले दर कायम ठेवली आहेत. त्यामध्येच पुन्हा एकदा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी अधिक होताना दिसत आहेत. सरकारी तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत 97.83 रुपये. दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 95.20 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये हा दर प्रति लिटर 99.02 रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.12 रुपये आहे. कोलकातामध्ये 113.51 रुपये, मुंबईत 111.21 रुपये आणि चेन्नईमध्ये 107.77 रुपये इतका आहे.

Follow Us