Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या, आज पेट्रोल-डिझेलचे दर काय?

बुधवारी भारतातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बहुतांशी स्थिर आहेत. नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये इंधनाच्या किमतींमध्ये कोणतrही विशेष बदल दिसून आला नाही.

Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या, आज पेट्रोल-डिझेलचे दर काय?
petrol diesel
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 09, 2026 | 8:37 AM

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करताना दिसत आहे. या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसली आहे. कच्चे तेल, पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पण आज ९ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आता जवळपास ९९.३६ डॉलर ते १०० डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचल्या आहेत. तरीही सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

आज कच्च्या तेलाची किंमत

आज ९ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) किमतींमध्ये तेजीचा कल कायम आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि होर्मुजजवळ तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यांमुळे ऊर्जा पुरवठ्यावर पुन्हा संकटाचे ढग आहेत. म्हणूनच कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलच्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय मानदंड मानला जाणारा ब्रेंट क्रूड ऑइल आज ९९.२९ ते ९९.४० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यापार करत आहे. कालच्या व्यवहार सत्रात तो काही काळ ९९ डॉलरपारही झाला होता. तर अमेरिकन बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटची किंमत ९४.२४ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास कायम आहे.

शहरनिहाय पेट्रोल-डिझेलच्या किमती

दिल्ली : पेट्रोल १०२.१२ रुपये, डिझेल: ९५.२० रुपये

मुंबई : पेट्रोल १११.३१ रुपये, डिझेल: ९७.९७ रुपये

कोलकाता : पेट्रोल ११३.५१ रुपये, डिझेल: ९९.८२ रुपये

चेन्नई : पेट्रोल १०७.७८ रुपये, डिझेल: ९९.५६ रुपये

गुरुग्राम : पेट्रोल १०२.९७ रुपये, डिझेल: ९५.९४ रुपये

पटना : पेट्रोल ११३.३५ रुपये, डिझेल: ९९.३६ रुपये

रांची : पेट्रोल १०६.१२ रुपये, डिझेल: १००.४९ रुपये

शिमला : पेट्रोल १०२.३१ रुपये, डिझेल: ९४.३४ रुपये

कच्च्या तेलाच्या किमती का वाढत आहेत?

मध्यपूर्वेत सध्या तणाव शिगेला पोहोचला आहे. एकीकडे अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. होर्मुजमध्ये दोन्ही देशांनी एकमेकांच्या तेल टँकरवर हल्ला केला. त्यामुळे जगभरात खळबळ माजली. या हल्ल्यांमुळे बाजारात पुरवठा थांबण्याची आणि तेलाच्या टंचाईची भीती बसली. वातावरण आणखी बिघडले आहे कारण होर्मुज हा असा शिपिंग मार्ग आहे, जिथून जगातील सुमारे २०% तेल जाते. या मार्गावर वाढत्या हल्ल्यांमुळे व्यावसायिक जहाजांची हालचाल कमी होऊ लागली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us