Fraud Call : चुकवूनही करु नका ही चूक, हा कॉल उचलल्यास बँक खाते होईल साफ

Fraud Call : फसवणुकीची अशा काही युक्ती आली आहे की, काही कळण्याआधीच बँक खाते साफ होत आहे. आता लिंकचा वापर होत नाही तर हा प्रकार करण्यात येत आहे.

Fraud Call : चुकवूनही करु नका ही चूक, हा कॉल उचलल्यास बँक खाते होईल साफ
Fraud Calls Online Fraud Cyber Crime
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 6:35 PM

नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : देशात डिजिटलायझेशनची लाट येत आहे, तसा सायबर भामटे नवीन आयुधांसह लुटण्यासाठी सज्ज झाले आहे. स्मार्ट पद्धतींचा वापर करत ते सर्वसामान्यांना गंडा घालत आहे. पूर्वी लिंक पाठवून, एसएमएस वा इतर फंडे वापरुन लुटण्यात येत होते. पण आता भांडफोड झाल्यानंतर भामट्यांनी ऑनलाईन लुटमार पद्धत बदलली आहे. एका कॉलवरच तुमचे खाते रिकामे करण्याची युक्ती सध्या वापरण्यात येत आहे. असे प्रकार आता वाढले आहेत. सायबर गुन्हेगार (Cyber Fraud) हायटेक झाले आहेत. एका फोन कॉलवरच ते सर्वसामान्यांना गंडवत आहेत. फोन उचलल्याबरोबर खात्यातून धडाधड रक्कम कपात होत आहे. तेव्हा या क्रमांकावरुन आलेले कॉल (Phone Call) उचलण्याची तुम्ही सुद्धा चुकी करु नका.

याठिकाणी घटना उघडकीस

उत्तरप्रदेशातील अलिगढमध्ये असा प्रकार उघड झाला आहे. एका महिलेला अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. तिने कॉल उचलला. तेव्हा तिला खात्यातून एक रुपया कपात झाल्याचा मॅसेज आला. त्यानंतर अवघ्या 10 सेकंदात या महिलेच्या बँक खात्यातून 9999 रुपये काढल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार होताना या महिलेने कॉल बंद करण्याचा प्रयत्न केला. पण तिला कॉल सुद्धा कट करता येईना. तिच्या खात्यातून त्याचवेळी दोनदा 10 हजार रुपये कपात झाले.

हे सुद्धा वाचा

कोणतीच आली नाही लिंक

सायबर फसवणुकीच्या या अजब प्रकारामुळे पोलीस पण चक्रावले आहेत. कारण या प्रकरणात सायबर गुन्हेगारांनी कोणतीची लिंक पाठवली नव्हती. तरीही केवळ एकाच फोन कॉलवर त्यांनी महिलेच्या खात्यातून मोठी रक्कम चोरली. हा प्रकार तर सर्वसामान्य लोकांसाठी धक्कादायकच आहे.

आता आधुनिक तंत्रज्ञानाचा होतो वापर

सायबर तज्ज्ञांच्या मते, सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. आता जुने फंड सर्वच लोकांना माहिती झाले आहेत. याविषयीची जाणीव जागृती पण झाली आहे. सायबर गुन्हेगारांचे जुन्या युक्त्या कामी येत नसल्याने त्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाला दिमतीला लावले आहेत. त्यामाध्यमातून ते बँक खात्यातून रक्कम गायब करत आहेत.

नाहीतर तुम्ही पण व्हाल शिकार

आता सायबर भामटे परदेशातील त्यांच्या मित्रांची मदत घेत आहेत. भारताचा कंट्री कोड 91आहे. तो मोबाईल क्रमांकाच्या अगोदर दिसतो. इतर देशातून आलेले कॉल त्या देशाच्या कंट्री कोड दर्शवितो. जर असा दुसऱ्या क्रमांकावरुन कॉल आल्यास तो उचलू नका. तुम्ही कॉल उचलल्यानंतर पुढच्या काही सेकंदातच तुम्हाला बोलण्यात गुंतवून ठेवत, हँकर्स तुमच्या मोबाईलचा ताबा घेतात. सेटिंग डिकोड करतात. तुमच्या खात्यातील रक्कम फटक्यात साफ करतात.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.