IMD weather alert : 13 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 2 लाख लोकांना सुरक्षित जागी हलवा, अकवान चक्रीवादळ दाखल, महत्त्वाचा अंदाज आला!

Cyclone akwan : बंगालच्या खाडीत अक्वान चक्रीवादळाचा धोका वाढला असून ओडिशातील 13 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने 2 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी केली आहे.

IMD weather alert : 13 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 2 लाख लोकांना सुरक्षित जागी हलवा, अकवान चक्रीवादळ दाखल, महत्त्वाचा अंदाज आला!
cyclone akwan alert for odisha and andhra pradesh
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 7:03 PM

बंगालच्या खाडीमध्ये चक्रवादळ अक्वानने धुमाकूळ घालण्यासा सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमिवर ओडिशाच्या 13 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक परिसरांमध्ये 100 किलोमीटर प्रतितासाने वेगवान वारे वाहू शकतात. एवढच नाही तर राज्य सरकार दोन लाखांहून जास्त नागरिकांना सुरक्षित जागेवर हलवण्यासाठीची तयारी करत आहे. आयएमडीने शुक्रवार म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशातील किनारपट्टीवर अकवान चक्रिवादळ धडकणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या भागामध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नेमकं काय घडतंय?

बंगालच्या खाडीमध्ये अकवान हे चक्रीवादळ आता त्याची ताकद सातत्याने वाढवत आहे. त्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला जात आहे. त्याचवेळी सुरक्षेची खबरदारी घेतली जात आहे. 13 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. सरकार यावेळी सर्व जिल्ह्यातील कलेक्टराच्या संपर्कात असून अनेक बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये संभाव्य धोक्यांवर अभ्यास करण्यात आला आहे. त्याचवेळी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकणाऱ्या परिसरातून तब्बल 2 लाख लोकांना सुरक्षित जागेवर हलवण्यासाठीची तयारीही करण्यात आली आहे.

Loading...

रायगडा या जिल्ह्यातील 50 ते 55 गावांमध्ये भूस्सखलनासारखी स्थिती उद्भवू शकते. किनारपट्टीतील भागात राहणाऱ्या आणि पर्यटनाला गेलेल्या लोकांना सुरक्षित ठेवणं हेही लक्षात घेऊन आपत्तीव्यवस्थापन विभाग काम करत आहे. दक्ष राहून उपाययोजना आखण्यात येत आहेत.

अकवान चक्रीवादळ हे बुधवारपासूनच ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या दिशेने कूच करत आहे. त्याचे केंद्र चेन्नईपासून 560 किलोमीटर पूर्वेला होते. आता ते घटले आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार शुक्रवार म्हणजे उद्या 20 नोव्हेंबर 2026 रोजी आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये धडकू शकतं.

या जिल्ह्यांना रेड अलर्ट

गंजाम, गजपती, कंधमाल, रायगडा, कोरापुट, कालाहंडी, बौध पुरी, नयागढ, खुर्दा या सारख्या मोठ्या जिल्ह्यांना हा अलर्ट दिला आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये शाळाही गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us