Cyclone alert : चक्रीवादळाचा धसका, रेल्वेचा मोठा निर्णय, इतक्या एक्सप्रेस रद्द; प्रवास करण्यापूर्वी यादी चेक करा

बंगालच्या खाडीतील अर्णव चक्रीवादळामुळे भारतीय रेल्वेने 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान 12 एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काही गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वे चौकशी सेवा (139), NTES किंवा IRCTC वेबसाइटवर आपल्या ट्रेनची सद्यस्थिती तपासावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Cyclone alert : चक्रीवादळाचा धसका, रेल्वेचा मोठा निर्णय, इतक्या एक्सप्रेस रद्द; प्रवास करण्यापूर्वी यादी चेक करा
Cyclone alert
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2026 | 11:20 PM

बंगालच्या खाडीत अर्णव चक्रीवादळ तयार झालं आहे. त्यामुळे या वादळाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि प्रचंड वादळ येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 12 राज्यांना या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसणार आहे. या वादळाचा रेल्वे प्रशासनानेही धसका घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने संभाव्य धोका पाहता मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान चालणाऱ्या एकूण 12 एक्सप्रेस आमि पॅसेंजर ट्रेन रद्द केल्या आहेत. दोन्ही ट्रेनला शॉर्ट टर्मिनेशन आणि शॉर्ट ओरिजिनेशन करण्यात आलं आहे.

रेल्वेने प्रवाशांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. प्रवास करण्यापूर्वी ट्रेनच्या येण्या आणि जाण्याची माहिती घ्या. लिस्ट चेक करा. त्यानंतरच प्रवास करा, असं रेल्वेने म्हटलं आहे. तसेच अधिक माहितीसाठी रेल्वे चौकशी सेवा (139), नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम (NTES), IRCTC वेबसाइट आदीवर संपर्क करण्याचं आवाहन रेल्वेने केलं आहे.

Loading...

वादळाचा तडाखा कुणाला?

यावेळी हवेचा वेग प्रति ताशी 140 ते 150 किलोमीटर असणार आहे. तब्बल 12 राज्यांना या चक्रीवादळाचा धोका असणार आहे. तर नऊ राज्यांमध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. या वादळाचा सर्वाधिक धोका आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला बसणार आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशासहीत तेलंगाना, छत्तीसगढ़, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, पूर्व राजस्थान, पश्चिमी मध्य प्रदेश, पूर्व गुजरात तसेच महाराष्ट्र महाराष्ट्रातील काही भागांना या वादळाचा तडाखा बसणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या ट्रेन

18005 हावडा – जगदलपूर संबलेश्वरी एक्सप्रेस: 27 ते 30 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

18006 जगदलपूर – हावडा संबलेश्वरी एक्सप्रेस: 28 ते 31 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

18107 राउरकेला – जगदलपूर इंटरसिटी एक्सप्रेस: 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत रद्द.

18108 जगदलपूर – राउरकेला इंटरसिटी एक्सप्रेस: 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत रद्द.

18515 विशाखपट्टणम – किरंडुल एक्सप्रेस: 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत रद्द.

18516 किरंडुल – विशाखपट्टणम एक्सप्रेस: 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत रद्द.

18512 विशाखपट्टणम – कोरापूट इंटरसिटी एक्सप्रेस: 30 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

18511 कोरापूट – विशाखपट्टणम इंटरसिटी एक्सप्रेस: 31 ऑक्टोबरपर्यंत रद्द.

या शिवाय पॅसेंजर ट्रेन (संख्या 58538, 58537, 58501 आणि 58502) सुद्धा 27 ते 30 ऑक्टोबरपर्यंत रद्द राहिल.

शॉर्ट टर्मिनेशन आणि शॉर्ट ओरिजिनेशन असणाऱ्या ट्रेन

18447 भुवनेश्वर – जगदलपूर हिराखंड एक्सप्रेस: 27 ते 30 ऑक्टोबरपर्यंत ही ट्रेन केवळ रायगडपर्यंतच चालवली जाईल.

18448 जगदलपूर – भुवनेश्वर एक्सप्रेस: 27 ते 31 ऑक्टोबरपर्यंत ही ट्रेन ठरलेल्या ठिकाणाऐवजी रायगडवरून सुटेन.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us