Cyclone Biparjoy: बिपिरजॉयचा हाहाकार! Video पाहा, किती भयानक…; अवाढव्य वृक्षही क्षणार्धात कोसळले

| Updated on: Jun 16, 2023 | 1:39 AM

गुजरात सरकारकडून वादळानंतर झालेल्या नुकसानीवर उपाय योजना करण्यात येत असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत आहेत. त्याच वेळी, यापूर्वी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

Cyclone Biparjoy: बिपिरजॉयचा हाहाकार! Video पाहा, किती भयानक...; अवाढव्य वृक्षही क्षणार्धात कोसळले
Follow us on

कच्छ : गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय वादळाचा जोर कायम असून मोठ्या प्रमाणात अनेक शहरांना फटका बसला आहे. तर हवामान खात्याच्या माहितीनुसार वादळाचा तडाका हा मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे वादळ ताशी 15 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. वादळाचा वेग अधिक असल्यान या वादळामुळे रात्रभर पावसाच्या शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. वादळाला आता कच्छच्या जाखाऊ बंदरात पोहोचण्यासाठी सुमारे 2 तास लागण्याची शक्यता वर्तवली आहे. तर पुढील 5 ते 6 तास सौराष्ट्र आणि कच्छसाठी आव्हानात्मक असणार आहेत असंही हवामान विभागाचे मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.

वादळाच्या जमिनीवर पडण्याची प्रक्रिया सायंकाळपासून सुरू झाली असून, मध्यरात्पर्यंत सुरू राहणार आहे. गुजरातमधील कच्छ, भुज, द्वारका, जामनगर, बडोदा यासह अनेक भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे.

किनारपट्टीवर लाटा उसळल्या


वादळामुळे रात्रभर पाऊस सुरू राहणार असून समुद्रात उंच लाटा उसळत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. द्वारकेसह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांबही पडले आहेत.

 

त्याचबरोबर कच्च्या घरांचेही नुकसान झाले आहे. हे वादळ ताशी 115 ते 125 किलोमीटर वेगाने किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी चक्रीवादळाचा वेग 140 पर्यंत जाणार आहे.

 

एका व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी गुजरातमधील लोक कसे भयानक वादळाचा सामना करत आहेत. तर बिपरजॉयचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून किनारी भाग रिकामा करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

 

कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येक तासाची माहिती

गुजरात सरकारकडून वादळानंतर झालेल्या नुकसानीवर उपाय योजना करण्यात येत असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत आहेत. त्याच वेळी, यापूर्वी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. तर बैठकीत त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हर्ष सिंघवी यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येक तासाची माहिती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.