LIVE : फनी वादळाने भुवनेश्वर विमानतळाच्या छताचा भाग उडाला

भुबनेश्वर (ओडिशा) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फनी’ चक्रीवादळ ताशी 200 किमी वेगाने ओडिशाकडे किनारपट्टीवर धडकलं. आज सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान हे चक्रीवादळ जगन्नाथ पुरीच्या किनाऱ्यावर धडकलं. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. फनी चक्रीवादळामुळे सध्या जगन्नाथ पुरीत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बंगालच्या खाडीलगत तयार झालेल्या जास्त दाबामुळे निर्माण …

LIVE : फनी वादळाने भुवनेश्वर विमानतळाच्या छताचा भाग उडाला

भुबनेश्वर (ओडिशा) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फनी’ चक्रीवादळ ताशी 200 किमी वेगाने ओडिशाकडे किनारपट्टीवर धडकलं. आज सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान हे चक्रीवादळ जगन्नाथ पुरीच्या किनाऱ्यावर धडकलं. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. फनी चक्रीवादळामुळे सध्या जगन्नाथ पुरीत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

बंगालच्या खाडीलगत तयार झालेल्या जास्त दाबामुळे निर्माण झालेल्या या चक्रीवादळाला ‘फनी’ हे नाव देण्यात आले आहे. बांग्लादेशने या चक्रीवादळाला ‘फनी’ हे नाव दिलं आहे. याचा अर्थ ‘साप’ असा होतो. याआधी बांग्लादेशकडून ‘ओखी’ या चक्रीवादळाला नाव देण्यात आलं आहे.

LIVE UPDATE :

Picture

ओडिशानंतर पश्चिम बंगालमध्ये धडकणार फनी वादळ

03/05/2019,12:02PM
 • फनी वादळाने भुवनेश्वरमध्ये विमानतळाचं छत उडालं
 • कोलकात्याकडे जाणाऱ्या सर्व विमानसेवा रद्द
 • फनी चक्रीवादळामुळे संध्याकाळी 4 नंतर कोलकाता विमानतळ बंद करण्यात येणार
 • वादळामुळे रस्तावर झाडं कोसळली, एनडीआरएफ पथकाद्वारे झाडे हटवण्याचे काम सुरु
 • रात्री साडे आठच्या सुमारास पश्चिम बंगालमध्ये धडकणार फनी वादळ
 • ओडिशाहून पुढे सरकले फनी वादळ
 • केंद्रीय गृहमंत्रालयाकडून १९३८ हा हेल्पलाइन क्रमांक जारी
 • फनी चक्रीवादळ सुपर सायक्लोन प्रकारातील वादळ
 • दुपारी 3 वाजेपर्यंत वादळाचा वेग तीव्र राहणार
 • मदतीसाठी नौदलाची 13 विमान सज्ज
 • चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींचा दौरा रद्द

 • सखीगोपाल परिसरात झाड पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

 • जगन्नाथ पुरीजवळ फनी वादळ धडकले, वाऱ्याचा वेग ताशी 245 किलोमीटर

 • गुरुवारी रात्रीपासून हवाई उड्डाण, रेल्वे सेवा बंद
 • 11 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं
 • वादळी वाऱ्यासह फनी चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीवर धडकले

फनी चक्रीवादळ जगन्नाथ पुरीपासून 60 किमी दूर आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशा किनारपट्टीतील सुमारे 11 लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगाल यांसह इतर ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.  फनी चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नौदल, हवाई दल, तटरक्षक दल यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागातर्फे यलो वार्निंगही देण्यात आलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीलगत तयार झालेल्या जास्त दाबामुळे फनी चक्रीवादळ निर्माण झालं आहे. हे वादळ आज ओडिशा किनारपट्टीवर धडकणार आहे. तसेच हे वादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

या वादळापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी 880 छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत. तसेच फनी चक्रीवादळाची तीव्रता बघता, ओडिशा, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगाल या ठिकाणच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही रेल्वेगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. या वादळामुळे मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *