
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात रविवारी (5 ऑक्टोबर 2025) जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाने मोठा विध्वंस झाला आहे. या भूस्खलनात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. खालच्या भागात जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. नुकसान झालेल्या भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जोरदार पावसामुळे या भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
सिक्किमशी जोडल्या गेलेल्या रस्त्याचा संपर्क तुटला आहे आणि सिलीगुडी-मिरिकचा थेट संपर्कही खंडित झाला आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दुधिया पूल वाहून गेला आहे. ऋषिखोला आणि पेडांग येथे भूस्खलनामुळे अनेक रस्त्यांवर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. दार्जिलिंगमधील या आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
वाचा: गौतमी पाटीलची दर महिन्याची कमाई किती? आकडा वाचून फुटेल घाम
राज्यातील विविध भागात होणारा जोरदार पाऊस आणि भूतानच्या वांगचू नदीची वाढती पाण्याची पातळी बंगालच्या लोकांसाठी अडचण निर्माण करू शकते. भूतानच्या अधिकाऱ्यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. कारण वांगचू नदीचे पाणी धरणावरून वाहत आहे. सतत वाढणारी पाण्याची पातळी उत्तर बंगालमध्ये पूराचा धोका वाढवू शकते. भूतानने यासंदर्भात बंगाल सरकारला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
उत्तर बंगालमध्ये अडचणी वाढण्याची शक्यता
वास्तविक, भूतान बंगालच्या उत्तरेला आहे, त्यामुळे उत्तर बंगालमध्ये अडचणी वाढण्याची शक्यता जास्त आहे. वांगचू नदीचे खालच्या दिशेने वाहणारे पाणी बंगालच्या जलपाईगुडी आणि कूचबिहार जिल्ह्यांना प्रभावित करेल. गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे अनेक भाग जलमग्न झाले आहेत.
धरण भरले
भूतानच्या थिम्पू येथील राष्ट्रीय जलविज्ञान आणि हवामानशास्त्र केंद्राने धोक्याचा इशारा दिला आहे. ड्रुक ग्रीन पावर कॉर्पोरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताला जलविद्युत धरणाचे दार उघडता आले नाहीत, त्यामुळे नदीचे पाणी धरणावरून वाहत आहे. ड्रुक ग्रीन पावर कॉर्पोरेशन हे जलविद्युत केंद्र भूतानमधील वांगचू नदीवर आहे, ज्याला भारतात प्रवेश केल्यानंतर रैदक म्हणून ओळखले जाते. वांगचू नदी बांगलादेशात प्रवेश करण्यापूर्वी बंगालमधून वाहते.
भूतानने दिला धोक्याचा इशारा
भूतानकडून धोक्याता इशारा आला आहे. पण इशारा दार्जिलिंगमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भाग जलमग्न झाल्यानंतर आणि भूस्खलनाला सामोरे जावे लागल्यानंतर आला आहे. भूस्खलनामुळे सिक्किमधील रस्त्याचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक अडकले आहेत. या आपत्तीत आतापर्यंत सुमारे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने पाऊस आणि पूर यासंदर्भात रेड अलर्ट जारी केला आहे. रस्ते वाहून गेल्याने सिलीगुडी-मिरिक यांचा थेट संपर्क तुटला आहे. जोरदार पाऊस आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दुधिया पूल तुटला आहे. ऋषिखोला आणि पेडांग येथे भूस्खलनामुळे अनेक रस्त्यांवर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.