दत्तात्रय होसबळे संघाचे नवे सरकार्यवाह; वाचा, कोण आहेत होसबळे?

| Updated on: Mar 20, 2021 | 12:51 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांचे निवड करण्यात आली आहे. (Dattatreya Hosabale Replaces Bhaiyyaji Joshi as RSS sarkaryawah)

दत्तात्रय होसबळे संघाचे नवे सरकार्यवाह; वाचा, कोण आहेत होसबळे?
Dattatreya Hosabale
Follow us on

बेंगळुरू: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांचे निवड करण्यात आली आहे. संघाच्या प्रतिनिधी सभेत होसबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. होसबळे यांचा सरकार्यवाहपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. यापूर्वी ते संघात सह सरकार्यवाह म्हणून कार्यरत होते. (Dattatreya Hosabale Replaces Bhaiyyaji Joshi as RSS sarkaryawah)

बेंगळुरूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक सुरू आहे. सरकार्यवाह निवडण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे पहिल्यांदाच नागपूरबाहेर ही सभा झाली. विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक पार पडली. त्यात होसबळे यांच्या नावावर सर्व संमतीने निवड करण्यात आली.

कोण आहेत होसबळे

दत्तात्रय होसबळे यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला. एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनेद्वारे त्यांनी राजकीय जीवनास सुरुवात केली. ते एबीव्हीपीमध्ये अॅक्टिव्ह होते. ते एबीव्हीपीचे दोन दशक संघटन महामंत्री होते. आता ते संघ सरकार्यवाह म्हणून संघात कार्यरत होते. होसबळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना पटण्याहून लखनऊला बोलावण्यात आले होते. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2015मध्येच होसबळे यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो अयशस्वी झाला. संघातील एका गटाने त्यांच्या नावाला विरोध केला होता.

अशी होते निवड

संघात सरसंघचालक हे पद सर्वात महत्त्वाचं आहे. नंबर एकचं हे पद आहे. संघाच्या प्रतिनिधी सभेत सरसंघचालकाची निवड केली जाते. संघाची स्वत:ची कार्यपद्धती आहे. निवडपद्धती आहे. परंतु, नव्या सरसंघचालकाची निवडीचा अंतिम निर्णय विद्यमान सरसंघचालकच घेतात. सरसंघचालकांचा उत्तराधिकारी सरसंघचालकांनीच निवडल्याची आजवर परंपरा राहिली आहे. हीच परंपरा आजवर होत आली आहे. मात्र, सरकार्यवाहाची निवड निवडणुकीद्वारेच होत असते. संघाच्या या निवडणुकीच्या प्रक्रियेत संपूर्ण केंद्रीय कार्यकारिणी, क्षेत्र व प्रांताचे संघचालक, कार्यवाह, प्रचारक आणि संघ प्रतिज्ञेसाठी सक्रिय असलेले स्वयंसेवकांकडून निवडलेले प्रतिनिधी सहभागी होतात.

दर तीन वर्षाने निवड

संघात दर तीन वर्षांनी सरकार्यवाहची निवड होते. संघटनेतील हे कार्यकारी पद आहे. तर सरसंघचालक हे मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. संघाच्या नियमित कार्यांच्या संचालनाची जबाबदारी सरकार्यवाहांवर असते. म्हणजे हे एकप्रकारे महासचिव पदच असते, मात्र संघात या पदाला सरकार्यवाह म्हटलं जातं. या शिवाय प्रतिनिधी सभेत इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड केली जाते. सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. प्रत्येक तीन वर्षानंतर जिल्हा स्तरावरून संघाची निवड प्रक्रिया सुरू होते. सरकार्यवाह आधी जिल्हा आणि महानगर संघचालकाची निवड करतात. त्यानंतर विभाग संचालक आणि प्रांत संघचालकांची निवड केली जाते. निवडणुकीनंतर सर्व अधिकारी आपल्या नव्या टीमची घोषणा करतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखिल भारतीय स्तरावर प्रतिनिधी सभेच्या बैठकीत सरकार्यवाहची निवड होते. त्याच बैठकीत क्षेत्र संघचालकाचीही निवड केली जाते. (Dattatreya Hosabale Replaces Bhaiyyaji Joshi as RSS sarkaryawah)

 

संबंधित बातम्या:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरकार्यवाहची निवड कशी होते?; वाचा सविस्तर

सर्वसामान्यांची बत्ती गुल, ऊर्जामंत्र्यांची पॉवर फुल, नितीन राऊतांच्या घरातील झगमगटावर भाजप आक्रमक

‘UPA चं पुनर्गठन करा, सोनियांच्या जागी शरद पवार यांना अध्यक्षपदी बसवा’, संजय राऊतांचं मोठं विधान