सर्वसामान्यांची बत्ती गुल, ऊर्जामंत्र्यांची पॉवर फुल, नितीन राऊतांच्या घरातील झगमगटावर भाजप आक्रमक

भाजप महाराष्ट्र या अधिकृत पेजवरुन नितीन राऊत यांच्या घराचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहे (BJP on Nitin Raut Home lights)

सर्वसामान्यांची बत्ती गुल, ऊर्जामंत्र्यांची पॉवर फुल, नितीन राऊतांच्या घरातील झगमगटावर भाजप आक्रमक
ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई : वाढीव वीज बिलानंतर भाजप आता वीज तोडणीवरुन आक्रमक झाली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या घर आणि कार्यालयातील झगमगाटावरुन भाजपने आरोपांची सरबत्ती केली आहे. आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा नमुना पाहा, असं ट्वीट भाजपने केलं आहे. (BJP allegations on Nitin Raut Home decorated with lights)

भाजप महाराष्ट्र या अधिकृत पेजवरुन नितीन राऊत यांच्या घराचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोत नितीन राऊतांच्या घराच्या आत दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळत आहे. “आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा एक नमुना… हे घर आणि कार्यालय आहे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं” असे ट्वीट भाजपने केले आहे.

“ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा नमुना”

“या ऐषोरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब, शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी !” अशी टीकाही भाजपने केली आहे.

बेकायदेशीरपणे विमान प्रवासावरुनही आरोप

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बेकायदेशीरपणे विमान प्रवास केल्याप्रकरणी भाजपने आरोप केला होता. याप्रकरणी आता केंद्रीय कॉर्पोरेट कार्य मंत्रालयानं वीज वितरण कंपन्यांना नोटीस पाठवून खुलासा मागवलेला आहे. भाजपचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. (BJP allegations on Nitin Raut Home decorated with lights)

नितीन राऊत यांनी वीज वितरण कंपनीच्या पैशाने चार्टर्ड विमान वापरल्याचा आरोप विश्वास पाठक यांनी केला होता. त्या संदर्भात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाकडे या संदर्भात तक्रार केली होती. आता कार्पोरेट कार्य मंत्रालयाने महावितरण कंपनीला नोटीस बजावून स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची आणखी अडचण होऊ शकते.

नितीन राऊत यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, भाजपचे विमान प्रवासाचे आरोप चुकीचे आहेत. यात काहीही तथ्य नाही. मी लॉकडाऊनमध्ये प्रवास‌ केलेला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीला येणं त्यासाठी गरजेच होतं. त्यात काही चुकीचं केलं, असं मला वाटत नाही, असं स्पष्टीकरण नितीन राऊत यांनी दिलं.

संबंधित बातम्या :

PHOTO : राज्यात वीज तोडणी, वीज मंत्र्यांच्या घरात मात्र झगमगाट

(BJP allegations on Nitin Raut Home decorated with lights)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI