भाजप नेत्याच्या लेकीने लगावली थेट PSI च्या कानशि‍लात, मंदिरातच वाद..

भाजपा नेत्याच्या लेकीने चक्क पीएसआयला मारहाण केली. या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली. हेच नाही तर या पीएसआयला मोठी धमकीही भाजपा नेत्याच्या लेकीकडून देण्यात आली. वाद प्रचंड वाढल्यानंतर भाजपा नेत्याने माफी देखील मागितली.

भाजप नेत्याच्या लेकीने लगावली थेट PSI च्या कानशि‍लात, मंदिरातच वाद..
BJP leader
| Updated on: Aug 15, 2026 | 12:03 PM

भारतीय जनता पक्षातील बड्या नेत्याच्या मुलीने थेट महिला पोलिस पीएसआयवर हल्ला केला. हेच नाही तर महिला पोलिसला धमकावण्यात आले. भाजपा नेत्याच्या लेकीने पीएसआयच्या कानाखाली जाळ काढला, ज्यानंतर खळबळ उडाली. हा प्रकार कर्नाटकातील श्रीरंगपट्टण येथील आरती अक्कडा मंदिरात घडला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. राजकीय नेत्याच्या मुलीची इतकी जास्त हिमत की, तिने थेट पीएसआयच्या कानाखाली जाळ काढला. ही घटना 12 ऑगस्ट रोजी 8.15 दरम्यान घडली. भीम अमावस्येनिमित्त मंदिरात मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती. पीएसआय सविता बी यांच्यासोबत हा प्रकार घडला. यानंतर लोकांमध्ये मोठे संतापाचे वातावरण बघायला मिळाले. कर्नाटकच्या तुमकुरू ग्रामीण मतदार संघात भाजप आमदार बी सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या यांनी दर्शनासाठी परवानगी मिळवण्यास विलंब झाला.

यावरून पीएसआय सविता बी यांच्याशी ऐश्वर्याचा वाद झाला. ऐश्वर्या यांनी थेट पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. हेच नाही तर भाजप नेते आणि आमदार बी सुरेश गौडा यांच्या मुलीने थेट पोलिस अधिकारी महिलेच्या कानाखाली ठेवून दिली. ऐश्वर्या यांनी शिवीगाळही केला. कर्तव्यावर असलेल्या महिलेला मारहाण एका राजकीय नेत्याच्या लेकीकडून झाल्याने खळबळ उडाली. हेच नाही तर थेट धमकावलेही. कैथानाहल्ल पोलिस स्टेशनमध्ये ऐश्वर्या यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 115(2), 352 आणि 351 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हा वाद वाढताना दिसला आणि लोकांची टीका सुरू झाली, यानंतर अखेर भाजप आमदार बी सुरेश गौडा यांनी लेकीने केलेल्या करारनाम्यावर माफी मागितली. मात्र, ऐश्वर्या यांनीही काही आरोप करत गुन्हा दाखल केला. मात्र, मुलीने केलेली मारहाण पीएसआयला त्यानंतर भाजप आमदार बी सुरेश गौडा यांनी वादावर पडदा टाकत त्यांनी माफी मागितली. यावर गौडा यांनी म्हटले की, माझी मुलगी तिच्या दोन मुलांसह मंदिरात गेली होती तिथे दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्यासाठी परवानगी मागितली.

गौडा यांनी दावा केला की, पोलिस अधिकाऱ्यांनी तिला आत मंदिरात जाण्यापासून रोखले. एका सर्कल अधिकाऱ्यांनी तिला आता जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पण तिने आपण आमदाराची मुलगी असल्याचे तिने सांगितल्यानंतर पीएसआयने तिला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर हा वाद सुरू झाला. माझ्या मुलीने पीएसआयला कानाखाली मारल्याचा व्हिडीओ आपण बघितला नसल्याचेही त्यांनी सांगितले. घडलेल्या प्रकारावर त्यांनी माफी मागितली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us