दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ मोदींच्या भेटीला, वक्फ कायद्याबद्दल मानले आभार!

दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (17 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधींनी वक्फ सुधारणा कायद्यामुळे मोदींचे आभार मानले.

दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ मोदींच्या भेटीला, वक्फ कायद्याबद्दल मानले आभार!
dawoodi bohra and narendra modi
| Edited By: | Updated on: Apr 17, 2025 | 9:12 PM

Narendra Modi And Dawoodi Bohra Community : दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (17 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधींनी वक्फ सुधारणा कायद्यामुळे मोदींचे आभार मानले. बऱ्याच काळापासून बोहरा समुदायाची ही मागणी होती, असेही मत या शिष्टमंडळाने व्यक्त केले आहे. सोबतच या शिष्टमंडळाने नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विश्वास’ या धोरणावर आमचा विश्वास आहे, असे मत मोदींपुढे व्यक्त केले आहे.

वक्फ सुधारणा कायदाला देशभरातून विरोध

सध्या वक्फ सुधारणा कायद्यामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या कायदाला विरोधक टोकाचा विरोध करत आहेत. तर सत्ताधारी भाजपाने हा कायदा मुस्लीम समाजाच्या हिताचे असल्याचा दावा केला आहे. मुस्लीम मसुदायानेदेखील या कायद्याला विरोध केला असून देशभरात ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात आले आहे. आता वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करत काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतलेली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाच आता बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाने वक्फ कायद्यामुळे मोदी यांचे आभार मानले आहेत.

जैसे थे ठेवण्याचा कोर्टाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने काही अंतरिम आदेश जारी केले आहेत. वक्फ बोर्डाकडून जी संपत्ती वक्फ असल्याचे घोषित करण्यात आलेले आहे किंवा नोंदणी करण्यात आलेली आहे, त्यात कोणताही बदल करू नये. परिस्थिती जैसे थे ठेवावी, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी एकूण सात दिवसांचा कालावधी दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे.

मोदी आणि बोहरा समुदायाचं खास नातं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोहरा समुदायाचे खूप जुने नाते आहे. याआधीही मोदी आणि दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधींची भेट झालेली आहे. गेल्या वर्षी कतारच्या दौऱ्यादरम्यान दोहा येते मोदी यांनी बोहरा समुदायाची भेट घेतली होती. पीएम मोदी यांनी 2023 साली मुंबईच्या दौऱ्यावर असताना माझे आणि बोहरा समुदायाचे चार पिढ्यांपासून नाते आहे, असे असे मोदी म्हणाले होते. दाऊदी बोहरा समुदाय गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. तेव्हापासून मोदी आणि या समाजाचे वेगळे नाते आहे.