चालत्या रुग्णवाहिकेतून मृतदेह रस्त्यावर फेकला, Video व्हायरल; नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एक रुग्णवाहिका स्ट्रेचरसह एक मृतदेह रस्त्यावर फेकत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चालत्या रुग्णवाहिकेतून मृतदेह रस्त्यावर फेकला, Video व्हायरल; नेमकं काय घडलं?
gonda
| Updated on: Aug 05, 2025 | 5:43 PM

उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 24 वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक लखनौ-गोंडा मार्गावर निदर्शने करत होते. त्याचवेळी एक रुग्णवाहिका येते आणि स्ट्रेचरसह मृतदेह रस्त्यावर टाकते. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना गोंडातील बालपूर जाट गावातील आहे. 1 ऑगस्ट रोजी मृत तरुण हृदय लाल याचा काही लोकांशी पैशांवरून वाद झाला होता. त्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली होती. या हाणामारीत तो गंभीर जखमी झाला होता, त्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान लखनौमध्ये त्याचा मृत्यू झाला.

या तरुणाच्या मृत्यूची बातमी अल्पावधित गावभर पसरली. त पोहोचताच तेथे संताप व्यक्त झाला. लखनौ-गोंडा रस्त्यावर गावकरी आणि कुटुंबीय जमा झाले. गावकरी रस्त्यावर आंदोलन करत होते. त्यामुळे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी लखनौ-गोंडा रस्त्यावरून एक रुग्णवाहिका मृतदेह घेऊन येत होती. या रुग्णवाहिकेच्या मागील दाावर एक व्यक्ती लटकलेली होती. रुग्णवाहिका आंदोलनस्थळी आहे तेव्हा त्या व्यक्तीने हृदय लालचा मृतदेह स्ट्रेचरसह रस्त्यावर टाकला.

पोलिसांची कसरत

हृदय लालचा मृतदेह रस्त्यावर टाकल्यानंतर रुग्णवाहिका पळून गेली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हृदयलालचा रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहून कुटुंब आणि गावकरी हैराण झाले. अनेक महिलांना मृतदेहाला मिठी मारत आक्रोश सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या कष्टाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवली. त्यानंतर मृतदेह एका छोट्या ट्रकद्वारे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.

पोलिस काय म्हणाले?

याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, तरुणाला मारहाण करणाऱ्या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. मृतदेह खाली टाकण्यावरून पोलिसांनी सांगितले की, मृतदेह खाली टाकणारा व्यक्ती कुटुंबातील सदस्य होता. मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन करण्याचा त्यांचा हेतू होता असं पोलिसांनी म्हटलं आहे.